Headlines

आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करा- भोर:रेणुका माता मंदिर परिसरात मोफत आरोग्य शिबिर‎




एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला भाविकांकडून प्रतिसाद मिळत आहे. श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्ट आणि आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अनेक भाविकांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी केली. या शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हिमोग्लोबिन आदी विविध आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्‍वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे आणि सचिन कोतकर यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर पार पडत आहे. या शिबिरात डॉ. सुकेश बिश्‍वास आणि डॉ. विशाखा भळगट यांनी भाविकांची आरोग्य तपासणी केली.
ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर म्हणाले की, वेळीच आरोग्य तपासणी केल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी किंवा त्यावर योग्य वेळी उपचार सुरू करण्यासाठी मदत होते. नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करून घ्यावी. ट्रस्टचे सचिव दत्तात्रय विटेकर यांनीही भाविक आणि नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *