![]()
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, बाभुळगाव नगरपंचायतीच्या हद्दीतील मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व नगरसेवकांनी स्वतंत्र निवेदनांद्वारे केली आह
.
यंदा पावसाने दडी मारल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. बियाणे, मशागत व इतर शेतीकामांवर केलेला खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बाभुळगावातील बहुतांश मालमत्ताधारकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या समोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या अडचणींचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त नागरिकांना आर्थिक दिलासा देणेही आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. लागू नियम व शासनाचे दिशानिर्देश विचारात घेऊन करमाफीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
दुष्काळात आर्थिक भार नको बाभुळगावातील बहुतांश मालमत्ताधारकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतीवरील खर्च वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत मालमत्ता कर भरणेही नागरिकांसाठी आव्हान ठरत आहे. त्यामुळे सन २०२६-२७ चा मालमत्ता कर माफ करून नगरपंचायतीने नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.