![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरण, अभिनेता इम्रान खानला दिलेली देश सोडण्याची नोटीस आणि सुप्रीम कोर्टातील याचिका या विविध मुद्द्यांवरून राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अंकिता भंडारी प्रकरणातील ‘त्या’ नेत्याला वाचवण्यासाठी राज्यपाल केले उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणाचा संदर्भ देत राऊत यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला. ते म्हणाले, “एका रिसॉर्टवर अंकिता भंडारीची संशयास्पद हत्या झाली. या गुन्ह्यात भाजपचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांचे नाव मुख्य आरोपी म्हणून समोर येत होते आणि त्यांची चौकशीही सुरू होती. मात्र, आपल्या एका आरोपी पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी मोदी-शहांनी मोठे कारस्थान रचले. चौकशी सुरू असतानाच दुष्यंत गौतम यांची थेट सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. राज्यपाल म्हणून मिळणाऱ्या संरक्षणामुळे त्यांची चौकशी थांबली आहे.” पुढे ते म्हणाले, “काल राहुल गांधींनी अंकिताच्या माता-पित्यांना दिल्लीत बोलावून इंडिया गेटवर आंदोलन केले. मात्र, अमित शहांच्या पोलिसांनी पहाटे चार वाजता त्या पीडितेच्या आई-वडिलांनाच अटक केली. ही या देशाची सध्याची स्थिती आहे.” इम्रान खानला नोटीस, मग शेख हसीनांचे काय? अभिनेता इम्रान खान याने तरुणांच्या बाजूने आंदोलनात सहभाग घेतल्याने त्याला २८ तारखेपर्यंत देश सोडून जाण्याची नोटीस पोलिसांनी दिली आहे. यावर तीव्र संताप व्यक्त करत राऊत यांनी सरकारला सवाल विचारले. “अमित शाह किंवा फडणवीसांचे सरकार काय करू शकते, हे यातून दिसते. इम्रान खानने तरुणांच्या बाजूने आवाज उठवला म्हणून त्याला देश सोडायला सांगितला. मग बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जायला का सांगत नाहीत? अक्षय कुमारसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार परदेशी नागरिक (NRI) आहेत, त्यांच्यावर कारवाई का होत नाही?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. सुप्रीम कोर्टावर विश्वास, जनतेतील असंतोषाची कोर्टालाही कल्पना सध्या सुरू असलेल्या जनआंदोलनावर बोलताना राऊत म्हणाले, “ही रस्त्यावरची लढाई आहे आणि आता आम्ही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दारात उभे आहोत. लाखो लोकांच्या उपस्थितीत, साडेपाच ते सहा तास दिल्लीच्या रस्त्यांवरून प्रवास करत राहुल गांधी आणि आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.” आज या याचिकेवर सुनावणी असून, देशातील जनतेमध्ये किती खदखद आणि असंतोष आहे, हे सुप्रीम कोर्टालाही माहिती असल्याने आमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. ———————– हेही वाचा.. MPSC आयोगाला रोहित पवारांचा थेट इशारा:म्हणाले- तुकाराम मुंढेंच्या धाकाचा परिणाम आहे का? जुनी कागदपत्रे नष्ट करण्यास विरोध महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (MPSC) कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या विरोधात विद्यार्थ्यांसोबत सलग अकरा दिवस रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आयोगाला पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘आंदोलन स्थगित केले म्हणजे प्रकरण संपले, अशा भ्रमात कुणीही राहू नये,’ असे सुनावत त्यांनी आयोगाच्या जुनी कागदपत्रे नष्ट करण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सविस्तर वाचा
Source link
इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस, मग अक्षय कुमारचं काय?:संजय राऊतांचा सरकारला सवाल, अंकिता भंडारी प्रकरणावरूनही हल्लाबोल