Headlines

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्याचा निर्णय:डॉ. हुलगेश चलवादींनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; 305 तालुक्यांतील विद्यार्थ्यांना लाभ




राज्यातील दुष्काळी तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क कोणतेही निकष न लावता सरसकट माफ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे प्रदेश उपाध्यक्ष तथा चलवादी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. राज्यातील अनेक भागांत अपुऱ्या पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे नुकसान, उत्पन्नातील घट आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे शेतकरी कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण पडतोय. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचा अतिरिक्त भार पालकांना सहन करावा लागू नये, यासाठी राज्य सरकारने घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण आहे. अस्मानी संकटामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण होऊ नयेत, ही या निर्णयामागील सकारात्मक भूमिका असल्याचे डॉ.चलवादी यांनी नमूद केले. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ देण्यात येत आहे. त्याचबरोबर बुधवारी राज्यातील आणखी ४० तालुके दुष्काळी म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. राज्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या ३०५ झाली असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. शिक्षण ही समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासुन वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाने अशा लोकहितकारी निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच परीक्षा शुल्क माफीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ द्यावे, अशी अपेक्षाही डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली. ————– हेही वाचा.. आतापर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना अग्रिम मदत दिली नाही: पैठणी बदनाम, लोकांची मागणी सोन्याच्या बिस्किटांपर्यंत; खासदार अनिल बोंडे यांचा विरोधकांवर पलटवार
“राज्यातील शेतकरी आज गंभीर दुष्काळात होरपळत आहे. खरीप पिके पूर्णपणे गेली असून रब्बीची पेरणीही धोक्यात आली आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत ‘देवाभाऊ’ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही सरकारने दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यात अशी 5 हजार रुपयांची ‘अग्रीम’ (आगाऊ) मदत दिली नव्हती. काँग्रेस नेत्यांना या रकमेची किंमत नसेल, पण आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा सण गोड करण्यासाठी हा अग्रिम मोठा आधार ठरणार आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निराश होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, संपूर्ण सरकार तुमच्या सोबत आहे,” असा विश्वास भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *