![]()
खुलताबाद तालुक्यातील शूलिभंजन परिसरातील वनक्षेत्रात गुरुवारी सकाळी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सुरूम येथील सोमेश्वर बाबासाहेब निर्वळ (३१) यांनी वनविभागाच्या हद्दीत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमेश्वर निर्वळ हे कालपासून अचानक गायब होते. त्यांचा मोबाईल सुलीभंजन शिवारातील वनक्षेत्रात लोकेशन दाखवत असल्याने मित्रांनी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने मित्र त्या जागेवर पोहोचले; मात्र सोमेश्वर मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक फौजदार मनोहर पुंगळे आणि बीट जमादार कृष्णा गवळी यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, वेरूळ येथे पाठवण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. पठाण यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून खुलताबाद पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सोमेश्वर यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलिस करीत आहेत. मित्रांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे गळफास घेतलेले ठिकाण शोधले. याठिकाणी सोमेश्वर गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळल्याने मित्रांना धक्का बसला आहे. मोबाइल लोकेशनमुळे मृतदेह सापडला सोमेश्वर निर्वळ याचा मोबाईल सुलीभंजन शिवारातील वनक्षेत्रात लोकेशन दाखवत असल्याने मित्रांनी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने मित्र त्या जागेवर पोहोचले; मात्र सोमेश्वर मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांना मानसिक धक्का बसला.
Source link
शूलिभंजन वनक्षेत्रामध्ये तरुणाने घेतला गळफास:मृत परतूर तालुक्यातील, आत्महत्येचे कारण अस्पष्ट