![]()
मराठीला जो विरोध होत आहे तो एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून होत आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? एकनाथ शिंदेंच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी जी भूमिका घेतली आहे, ती महाराष्ट्राच्या हिताची आहे, त्यांच्या भूमिकेला विरोध करणारे मराठी माणसांचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी ही भूमिका योग्य आहे असे सांगितले पाहिजे. संजय राऊत म्हणाले की, शिवसेना या भूमिकेसाठी अनेक वर्षांपासून लढत आलेली आहे. महाराष्ट्रात मराठीला विरोध करत लोकं इथे कसे काय राहू शकतात, असा सवाल राऊत यांनी केला आहे. तुम्ही ज्या राज्यात आहेत तिथली भाषा तुम्हाला आलीच पाहिजे हे बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती, ती सर्व प्रदेशातील मातृभाषेसाठी होती. उद्धव ठाकरेंनी विधीमंडळात असावे हे सर्वांचे मत संजय राऊत म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यासोबतच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल सुद्धा दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी त्यांचा आग्रह होता की राज्यसभेसाठी आपण शरद पवार यांचा सारखा नेता पाठवला आहे. तर विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी जावे ही आमची भूमिका आहे. मविआच्या आमदारांसाठी तुम्ही सभागृहात असणे गरजेचे आहे. हेच मत सुप्रिया सुळे यांनी देखील व्यक्त केले. उद्धव ठाकरेंनी मविआचे नेतृत्व करावे संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आमच्या पक्षातील सर्व नेत्यांसह मविआतील नेत्यांनी विनंती केली आहे की, तुम्ही विधीमंडळात जाणे आणि मविआचे नेतृत्व करणे गरजेचे आहे, यासाठी आम्ही त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करणे काहीही चुकीचे नाही. पुढील राज्यसभेच्या बाबतीमध्ये आम्ही काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करू. मोदींच्या काळात देशाचा नरक झाला संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी आता तरी पत्रकार परिषद घेत हा देश नरक नाही तर नंदनवन आहे हे सांगितले पाहिजे. हे नंदनवन होते त्यांचा नरक करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.ट्रम्प यांच्याकडे त्याबद्दल पक्की माहिती आहे, असे त्यांच्या विधानातून दिसून येत आहे.
Source link
मराठीला विरोध करणारे महाराष्ट्राचे शत्रू!:संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, मविआच्या आमदारांना उद्धव ठाकरेंचे नेतृत्व हवे