![]()
युद्धाचा फटका घरगुती गॅस पुरवठ्यालाबसला आणि शहरात पॅनिक बुकिंग सुरूझाले. आता परिस्थिती सुधारत असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत असले तरी वास्तव भयावह आहे. गॅस एजन्सींकडून घरपोच सिलिंडर देण्यास होणारी टाळाटाळ व पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जळगावकर 42 ते 43 अंशांच्या रणरणत्या उन्हात चक्क दुचाकी व सायकलवर धोका पत्करून गॅस सिलिंडरची वाहतूक होत आहे.या तापमानात अचानक दाब वाढून सिलिंडर स्फोटाची भीती वाढली आहे. कोल्हे हिल्स परिसरातील भारत गॅसचे गोडाऊन आणि एमआयडीसीतील जळगाव गॅस एजन्सी परिसरात बुधवारी ‘दिव्यमराठी’च्या चमूने पाहणी केली. या वेळी भरदुपारी उन्हात अनेक नागरिक दुचाकी, सायकल, रिक्षात सिलिंडर घेऊन घरी जाताना दिसले. या वेळी काही नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी एजन्सीच्या मनमानीचा पाढाच वाचला. बुकिंग होऊन 15 दिवस उलटले आहे. एजन्सीला फोन केला की गाडी येईल एवढेच उत्तर मिळते. लवकर हवा असेल तर स्वतः गोडाऊन वरून घेऊन जा असे डिलिव्हरी मॅनने सांगितल्याने ते घेण्यासाठी आम्ही समतानगर भागातून एमआयडीसीत आल्याचे सांगितले. 42 अंश तापमान; स्फोटाची भीती जळगावचे तापमान सध्या चाळिशी ओलांडून 45 अंशांकडे जात आहे. अशा परिस्थितीत दुचाकीवर सिलिंडर नेणे धोकादायक आहे. तज्ज्ञांच्या मते, बाहेरील तापमान वाढल्यास सिलिंडरमधील वायूचा दाब वेगाने वाढतो. त्यातच दुचाकीचा अपघात झाल्यास किंवा सिलिंडर रस्त्यावर आदळल्यास मोठा स्फोट होऊन जीवितहानी होऊ शकते. प्रशासनाचा दावा की शुद्ध फसवणूक? पुरवठा विभागाने सध्या गॅसचा वेटिंग पिरियड 5 ते 6 दिवस असल्याचे सांगत सर्व आलबेल असल्याचा दावा केला आहे; मात्र प्रत्यक्ष गोडाऊनवर येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढलेली आहे. 15 दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले ग्राहक पाहता, प्रशासनाचा हा दावा फोल असल्याचे सिद्ध होत आहे. एजन्सी चालक टंचाईचा बागुल बुवा उभा करून ग्राहकांना स्वतःहून सिलिंडर नेण्यास प्रवृत्त करत असल्याचे चित्र आहे. दिव्य मराठी एक्सपर्ट डॉ. कृष्णा श्रीवास्तव, एसएसबीटी महाविद्यालय तापमानात अचानक दाब वाढूनसिलिंडरचा स्फोट होण्याचा धोका दुचाकीवरून गॅस सिलिंडरची वाहतूक करणे हागंभीर सुरक्षेचा प्रश्न आहे. पेट्रोलियम ॲण्ड एक्स्पोझीव्हस सेफ्टी ऑर्गनायझेशन नियमाने उन्हाळ्यात अशी वाहतूक धोकेदायक आहे. सिलिंडर 50 ते 55 अंशांपर्यंत सुरक्षित असतात;पण त्यापेक्षा जास्त तापमानात दाब वाढून स्फोटाचा धोका निर्माण होतो. दुचाकीवरून सिलिंडर नेणे म्हणजे जीवाशी खेळणे होय. हलगर्जी करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करणार घरपोच सिलिंडर देण्याचे निर्देश सर्व एजन्सींना दिले आहे. सध्या युद्ध किंवा टंचाई याची अडचण राहिलेली नाही. त्यामुळे वेटिंग पिरियड आता 5 ते 6 दिवसांचा आहे. नागरिकांना गोडाऊनमधून सिलिंडर नेण्याचे सांगण्यात येत असेल तर अशा एजन्सींवर कारवाई केली जाईल. – महेश चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी
Source link
दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:गॅस सिलिंडर नव्हे जिवंत बाॅम्ब, जळगावात 42 अंश तापमानात उघड्यावर धाेक्याची वाहतूक, गॅस एजन्सींची मनमानी