Headlines

मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय:अर्धवट विसर्जित दुर्गामूर्तींचे फोटो काढण्यावर आणि व्हायरल करण्यावर कडक बंदी




दुर्गा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. २० ते २२ ऑक्टोबर दरम्यान दुर्गा विसर्जनाच्या वेळी पाण्यात तरंगणाऱ्या किंवा अर्धवट विसर्जित झालेल्या (बुडालेल्या) दुर्गामूर्तींचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास आणि ते सोशल मीडियावर पसरवण्यावर पोलिसांनी कडक बंदी घातली आहे. सार्वजनिक शांततेसाठी पोलिसांचे पाऊल मुंबईचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी नव्याने लागू झालेल्या ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ (BNSS), २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशात नेमकं काय म्हटलं आहे? पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, २० ते २२ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई शहरातील विविध तलाव, समुद्रकिनारे आणि जलाशयांमध्ये देवी दुर्गेच्या मूर्तींचे विसर्जन केले जाईल. या प्रक्रियेदरम्यान, समुद्रातील भरती-ओहोटीमुळे किंवा तलावाच्या पाण्यावर तरंगत काही अर्धवट विरघळलेल्या मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर येण्याची शक्यता असते. अशा वेळी बीएमसीचे (BMC) कर्मचारी या मूर्ती पाण्याबाहेर काढण्याचे काम करतात. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, “अशा अर्धवट विसर्जित मूर्तींचे फोटो किंवा व्हिडिओ काढणे, ते सोशल मीडियावर व्हायरल करणे किंवा बीएमसी कर्मचाऱ्यांनी त्या मूर्ती बाहेर काढतानाचे दृश्य शेअर केल्यास भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. यातून सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही कृती टाळण्यासाठी तत्काळ खबरदारीची पावले उचलणे आवश्यक आहे.” या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. —————- हेही वाचा.. आई राजा उदो उदो: मनमोहक तांदळा ते हरि-हराचे स्थान, श्रद्धा, परंपरा आणि सेवाभाव!; संभाजीनगरातील रेणुका मातेची साठा उत्तराची कहाणी…!

एखाद्या मंदिराची ओळख केवळ गाभाऱ्यातील मूर्तीपूर्ती मर्यादित नसते; तर मंदिराभोवती विणल्या गेलेल्या कथांशीही संबंधित असते. असेच आपल्या शहरातील बीड बायपास या ठिकाणचे रेणुका मातेचे मंदिर आहे. जिथे भाविक मोठ्या संख्येने आपले गाऱ्हाणे सांगायला देवीच्या चरणी येतात. देवीचे मनमोहक रूप पाहून सारे दुःख दूर होते. तसं पाहायला गेलं तर शहरामध्ये अनेक देवीची मंदिर आहेत. मात्र या मंदिराचे वैशिष्ट्य नेमके काय? मंदिराचा इतिहास आणि हे मंदिर स्थापन कसे झाले? जाणून घेऊयात या स्पेशल स्टोरीमधून… सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *