Headlines

MPSC Exam Controversy; Vivek Bhimanwar On Leave, Satish Waghole Takes Charge


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर आयोगातील काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. या गैरप्रकारामुळे संतप्त झालेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात सलग 10

.

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारच्या वतीने मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यात जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. राज्य सरकारने या गैरप्रकाराच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. तसेच, वाढता विरोध पाहता आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्वतःहून रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या आश्वासनानंतर आणि भीमनवार रजेवर गेल्याने विद्यार्थ्यांनी अखेर आपले आंदोलन मागे घेतले.

सतीश वाघोले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

विवेक भीमनवार रजेवर गेल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या आदेशानुसार या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

महिनाभरातच मोठी जबाबदारी

सतीश वाघोले हे नुकतेच सप्टेंबर 2026 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सदस्य म्हणून दाखल झाले होते. विशेष म्हणजे, 7 सप्टेंबर रोजी स्वतः विवेक भीमनवार यांनीच वाघोले यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. मात्र, केवळ एका महिन्याच्या कालावधीत निर्माण झालेल्या या अनपेक्षित परिस्थितीमुळे सतीश वाघोले यांच्यावर आता अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी आली आहे.

चौकशी समितीची स्थापना

राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिलेल्या शब्दानुसार पेपरफुटी आणि आयोगातील गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची अधिसूचना जारी केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले हे या चौकशी आयोगाचे अध्यक्ष असतील. या पाच सदस्यीय समितीत निवृत्त न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यासह तुकाराम मुंढे, गणेश पाटील आणि लखामी गौतम या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या संदर्भातील ही देखील बातमी वाचा..

MPSC चौकशी समितीबाबत तुकाराम मुंढेंचा खुलासा:म्हणाले, ‘अधिकृत पत्र आलेलं नाही, पण चर्चा झालीय’

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि विविध गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून स्थापन करण्यात येणाऱ्या समितीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या समितीच्या सचिवपदाची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती. मात्र, या नियुक्तीसंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत पत्र किंवा नोटिफिकेशन मिळाले नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. संबंधित विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले असले, तरी अधिकृत आदेश प्राप्त होईपर्यंत याबाबत भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.