![]()
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची परिस्थिती गरिबीची होती. कामधंदा करून गावातील शाळेत ते शिकले. ते जागेपणी मोठी स्वप्ने पाहत. ती जिद्दीने साकार करत. ज्ञान हाच देव आहे, असे ते मानत. नित्य चांगले वाचन केले की तो प्रसन्न होतो. चांगले काम केले की तो प्रसन्न होतो. यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे आपणही ज्ञानाच्या देवाला प्रसन्न करण्यासाठी नेहमी चांगल्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी विठ्ठल कुलट यांनी केले. बोर्डी येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. कलाम यांना आदरांजली अर्पण करताना विठ्ठल कुलट यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. डॉ. कलाम यांच्या देशाप्रती असलेल्या योगदानाला उजाळा दिला. केल्या. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या ‘कविता कशी सुचते?’, ‘लेखन कसे करावे?’ अशा विविध प्रश्नांना त्यांनी आपुलकीने उत्तरे दिली. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचे त्यांनी कौतुक केले. प्रास्ताविक उमेश चोरे यांनी केले. सूत्रसंचालन शर्वरी राजगुरू व तन्वी खिरकर यांनी केले. आभार खुशी अवचार यांनी मानले. यशस्वीतेसाठी सतीश धांडे, रामदास पंधरे, नितीन मासोदकर, विनोद तळोकार, लता पुराम, माया लायबर, रागिनी खोटरे, निलेश राजगुरू आणि रुपाली राजगुरू यांनी सहकार्य केले.
Source link
चांगली पुस्तकं वाचल्यास ज्ञानदेव प्रसन्न- विठ्ठल कुलट:बोर्डी येथील पीएमश्री शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात