Headlines

नवरात्रोत्सवात डाळिंबासह सीताफळ दोनशे पार‎:उपवास, पूजा अन् प्रसादासाठी मागणी, केळी 50 रुपये डझन, सफरचंद 180 रुपये किलोवर‎


.

नवरात्रोत्सव सुरू झाल्याने फळांची मागणी वाढली आहे. या काळात अनेक भाविक उपवास करतात. उपवासासाठी फळांना अधिक पसंती दिली जाते. देवीच्या पूजेसाठी, नैवेद्यासाठी, तसेच प्रसाद म्हणूनही फळांचा वापर केला जातो. त्यामुळे बाजारात फळांची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. मागणी वाढल्याने फळांच्या किमतीत थेट २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डाळिंब, सीताफळ २०० रुपये प्रतिकिलोच्या पार गेले आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात फळे खरेदी करताना ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

फळांची मागणी जास्त असल्याने ठराविक काळासाठी चढ-उतार सुरूच असतो. मागणी जास्त झाली की किंमती वाढतात. हा नेहमीचा अनुभव आहे.

फळे आहारासाठी, शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे ती खावीच लागतात. काही दिवसांपूर्वी पपईला मागणी नव्हती. त्याची किंमतही कमी होती. आता तिचीही किंमत वाढली आहे. त्यामुळे सकाळपासूनच ग्राहकांची बाजारात फळे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे शहरातील फळ विक्रेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. टरबूज ४० मोसंबी ८० सीताफळ २०० केळी ५० (डझन) डाळिंब २०० पेरू १६० पपई ८० सफरचंद १८०

मागणी वाढली ^नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून फळांची मागणी दरवर्षी असते. उपवासासाठी, तसेच देवीच्या पूजेसाठी ग्राहकांकडून विविध फळांची खरेदी केली जाते. यावर्षीही मागणी वाढल्यामुळे फळांचे दर वाढले आहेत. सणासुदीच्या काळात नेहमीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या वाढते. फळांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. – बंडू इंगळे, फळ विक्रेता, अमरावती

केमिकलमुक्त फळे निवडा ^सणासुदीत मागणी जास्त असल्याने फळे लवकर पिकवण्यासाठी केमिकलचा वापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे खरेदी करताना फळांचा रंग आणि वास तपासूनच खरेदी करा. आवक कमी असलेल्या महागड्या फळांऐवजी स्थानिक बाजारात उपलब्ध असलेली ताजी, आरोग्यदायी फळे निवडा. नैसर्गिकरित्या पिकलेली फळे सर्व बाजूंनी एकसारखी पिवळी नसतात. त्यांना नैसर्गिक सुगंध असतो. त्यामुळे अतिशय चकचकीत किंवा एकसारखा पिवळा रंग असलेली फळे खरेदी करणे टाळावे. – डॉ. साची पाटील, होमिओपॅथिक फिजिशियन, आहार तज्ञ, अमरावती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *