![]()
राज्यात एकीकडे कडक ऊन आणि उकाडा कायम असतानाच, दुसरीकडे पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18,19 आणि 20 ऑक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. याचबरोबर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर येथेही आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत पावसाची शक्यता मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना विशेष यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा, रायगड, बीड आणि परभणी या जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. त्यामुळे संबंधित भागांतील नागरिकांनी हवामानातील या बदलांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाचा हा लपंडाव कायम राहण्याची शक्यता आहे. मान्सून माघारी, मात्र हवामान अस्थिर दरम्यान, नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या उर्वरित सर्व भागांसह गोवा, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा आणि झारखंड-छत्तीसगडच्या काही भागातून अधिकृतपणे मागे फिरला आहे. मात्र, आगामी काही दिवसांत उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागांत हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः उत्तर भारत आणि डोंगराळ प्रदेशातील अनेक भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जना होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हे ही वृत्त वाचा दुष्काळग्रस्तांना 5 हजारांची मदत फेकून मारली, पण निवडणुकांवर लाखांची उधळण:कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांचे खिसे झटकले तरी1 लाख कोटी मिळतील- संजय राऊत
राज्याच्या तिजोरीत पैसा नाही, मात्र जे राज्य चालवत आहेत, त्यांच्याकडे तिजोरीच्या लुटीतून आलेली प्रचंड संपत्ती आहे. सर्वात जास्त पैसा भाजप आणि शिंदे गटाकडे आहे. हा पैसा कुठून आणि कसा आला, याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केल्यास राज्याचे कर्ज आपोआप कमी होईल. एवढेच नव्हे, तर कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी रुपये जमा होऊ शकतात, असा घणाघाती आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Source link
कोकण किनारपट्टीवर पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज:धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोलीत पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाची माहिती