Headlines

शहर स्वच्छतेचे धडे शाळेतूनच, राज्यातील पहिला प्रयोग!:छत्रपती संभाजीनगर मनपाचा पुढाकार




शहराच्या स्वच्छतेची सुरुवात आता शाळेतूनच होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील शहराचे मानांकन उंचावण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वच्छतेचे धडे देण्याचा पुढाकार घेतला आहे. राज्यातील पहिला प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत आहे. शहरातील शाळेच्या परिपाठातच हा उपक्रम घेण्यात आला आहे. या वेळी विद्यार्थ्यांना घंटागाडीचे वजन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि सुक्या कचऱ्याच्या पुनर्चक्राची प्रक्रिया समजावून सांगण्यात येते. शहर स्वच्छतेचा धडा शाळेतच मिळाला पाहीजे म्हणून शहारातील सुमारे १०० पेक्षा जास्त आयसी सदस्य यासाठी परिपाठाच्या वेळीच जाऊन महत्त्व समजावून सांगातात. शिवाय कचरा प्रक्रिया केंद्राला विद्यार्थ्यांची भेटही करून आणतात. महापौर समीर राजूरकर व आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला. घरोघरी संदेश पोहोचवणार : पुस्तकातील शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभवातून स्वच्छतेच्या सवयी रुजवणे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचवून शहराच्या स्वच्छता मोहिमेला बळ देण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *