Headlines

1 रुपयात डेटिंगची भुरळ घालत तरुणाला "हनीट्रॅप'मध्ये अडकवले:व्हिडिओ काढून यूट्यूबरच्या मदतीने केला प्रकार‎




इन्स्टाग्रामवर “१ रुपयात एक दिवसासाठी डेटिंग’ अशी भुरळ पाडणारी जाहिरात पाहून चॅटिंग करणे एका २५ वर्षीय भाजीपाला विक्रेता तरुणाला चांगलेच महागात पडले. एका महिलेने साथीदाराच्या मदतीने त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवले. त्याचे अश्लील व्हिडिओ तयार केले. त्यानंतर ते प्रसारित करण्याची धमकी देत तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागितली. १ लाख रुपये उकळले. एवढ्यावरच न थांबता एका यूट्यूबरला सोबत घेऊन पुन्हा ५ लाखांची मागणी केली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख आमीन शेख बिलाल (२४, रा. मुजीब कॉलनी, रोशन गेट), एक महिला (४०) आणि यूट्यूबर तकी हसन खान, अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी आमीन व संबंधित महिलेला अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही माहिती पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांनी दिली. पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार “पोलो डेटिंग’ ॲप डाऊनलोड केल्यानंतर २२ ऑगस्ट रोजी त्याची एका महिलेशी ओळख झाली. तिने त्याला मुकुंदवाडी येथे भेटायला बोलावले. तेथून तिने त्याला एपीआय कॉर्नर परिसरातील एका लॉजवर नेले. तिथे दोघांचे नकळत अश्लील चित्रीकरण करत ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *