Headlines

उद्या दसरा मेळाव्यांचा रणसंग्राम:शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची डरकाळी, तर नेस्कोतून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार; भक्तिगडावर पंकजा मुंडे, नारायणगडावर जरांगेंचा मेळावा



मुंबईच्या राजकीय आखाड्यात यंदाचा दसरा केवळ सोहळा नसून आरपारच्या लढाईचे महामैदान ठरणार आहे. अखेरच्या क्षणापर्यंत पालिकेच्या लालफितीच्या कारभारात अडकवल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ऐतिहासिक ‘शिवतीर्थ’ खेचून आणले खरे; पण महापालिकेने २४ अटींची ‘तटबं

.

शिंदेंच्या मेळाव्यात २५ हजार सायकल वाटप होणार नेस्कोचा मेळावा थेट दुष्काळग्रस्तांना समर्पित करत शिंदेंनी ठाकरेंच्या भावनिक प्रचाराची हवा काढण्याची रणनीती आखली आहे. केवळ व्यासपीठावरून डरकाळ्या न फोडता २५ हजार सायकली, २५ हजार शिलाई मशीन्सचे थेट वाटप आणि ‘भगवा खांद्यावर, शिवसैनिक बांधावर’ मोहिमेची घोषणा करत प्रत्यक्षात मदतीची ढाल उभारून ठाकरेंचा ‘गद्दार’ हा नरेटिव्ह मोडीत काढण्याचा हा शिंदेंचा पूर्वनियोजित राजकीय डावपेच आहे.

ठाकरे करणार सरकारवर टीका

मुंबईतील मोक्याचे भूखंड, मर्जीतील बिल्डरांच्या घशात घातलेले एसआरए प्रकल्प आणि गुजरातधार्जिण्या धोरणांवरून उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांची पिसे काढण्याच्या तयारीत आहेत. आणि आक्रमक इशारा ठाकरे देण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

मेळाव्यासाठी पालिकेचा कडक ‘पहारा’

  • वेळेची मर्यादा : २० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंतच मैदानाचा ताबा; १९ ऑक्टोबरला केवळ पूर्वतयारीची मुभा.
  • डेसिबलवर टाच : रात्री १० वाजता ध्वनिक्षेपकांचे तोंड बंद करावे लागणार; आवाजाच्या मर्यादेवर पोलिसांचा थेट वॉच असणार आहे.
  • मैदानाचे नुकसान निषिद्ध : खड्डे खणणे, खिळे ठोकण्यास पूर्ण बंदी; नियम मोडताच २० हजार रुपयांची अनामत रक्कम जप्त होणार.

नेस्कोतून शिंदेंचा पलटवार

एकनाथ शिंदे ठाकरेंच्या आघाडीच्या लाचारीची लक्तरे वेशीवर टांगतील. सावरकरांचा अपमान मूकपणे गिळणाऱ्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नाही असा घाव घालत ‘खरी शिवसेना आणि खरा वारसा आमचाच’ असे शिंदे सांगू शकतील.

शिवतीर्थावर राज ठाकरेंची एन्ट्री?

शिवाजी पार्कवर होणाऱ्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात यंदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही उपस्थिती राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार, राज ठाकरे हे केवळ उपस्थितच राहणार नसून दसरा मेळाव्याला संबोधितही करू शकतात. दोन्ही ठाकरे बंधू दसरा मेळाव्यात एकाच मंचावर एकत्र येऊन आपापल्या कार्यकर्त्यांना सत्ताधारी पक्षाविरोधात तरुणांच्या ज्वलंत मुद्द्यांवर एकजुटीने लढा देण्याचा थेट राजकीय संकेत देण्याच्या तयारीत असल्याचा मोठा दावा केला जात आहे.

माजी उपराष्ट्रपती धनखड संघाच्या सोहळ्यात पाहुणे

नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मंगळवारी २० ऑक्टोबरला नागपुरातील रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या विजयादशमी उत्सवासाठी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना निमंत्रित केले आहे. इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच विशेष अतिथी असतील. सकाळी ७.४० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मार्गदर्शन करतील.

भक्तिगडावर पंकजा मुंडे, नारायणगडावर जरांगे

बीड | बीड जिल्ह्यात दसऱ्याला दोन मेळावे राज्याचे लक्ष वेधून घेतात. पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे संत भगवान बाबांच्या जन्मभूमीत भगवान भक्तिगडावर भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांचा यंदा बारावा (तपपूर्ती) दसरा मेळावा होत आहे. तर, श्री क्षेत्र नारायणगड येथे मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत तिसरा दसरा मेळावा होणार असल्याने याकडेही लक्ष असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *