Headlines

'घराबाहेर उभा आहे, तुला ठोकून टाकेन':आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीविरोधात आव्हाडांची पोलिसांत तक्रार




मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच, आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने आव्हाड यांना फोन करून, “घराच्या बाहेर उभा आहे, तुला ठोकून टाकेन” अशी थेट धमकी दिली. या गंभीर प्रकारानंतर आव्हाड यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून, संबंधित व्यक्तीने पाठवलेला व्हॉट्सॲप मेसेजही त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना ताजी असतानाच, आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ माजली आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी एक मोबाईल नंबर शेअर करत आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 7038841820 ह्या इसमानी 2/3 वेळा मला फोन केला, भ्रमणध्वनीवर अर्वाच्च भाषेत बोलून मारण्याची धमकी दिली. हे आत्ता 4.30 पासून सुरू होते, तो इसम माझ्या घराच्या दरवाजावर उभा असल्याचं बोलत होता, अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे. ‘आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला’ या धक्कादायक प्रकारानंतर आव्हाड यांचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी संबंधित मोबाईल नंबरवर कॉल केला असता, त्या व्यक्तीने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. “आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला पण गोळ्या घालेन, घरच्या बाहेर येऊन गेलो,” असे त्या व्यक्तीने वाणी यांना सांगितले. या अत्यंत गंभीर प्रकारानंतर हेमंत वाणी यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली आहे. पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते आणि विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. आता त्यांना नव्याने आलेल्या या धमकीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, ही धमकी राजकीय हेतूने दिली आहे की यामागे अन्य काही कारण आहे, हे पोलिसांच्या तपासातूनच समोर येईल. दरम्यान, या गंभीर प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतल्याची माहिती मिळालेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *