![]()
मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी राजस्थान पोलिसांनी सोमवारी सकाळी 10:30 वाजता कोटा येथे तीन संशयितांना अटक केली. सर्व आरोपी पुणे-जयपूर एक्सप्रेसने जयपूरला जाण्याच्या तयारीत होते. त्यानंतर बसने दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याची त्यांची योजना होती, परंतु पोलिसांनी त्यांना कोटा रेल्वे स्टेशनवर पकडले. या संदर्भात मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत DCP राज तिलक रोशन यांनी सांगितले की, काल जुहू एरियामध्ये एक प्रसिद्ध सिने अभिनेता आहे. ते एक व्यक्तिगत कामासाठी बाहेर गेलेले होते. तिथून निघताना त्यांच्या गाडीवर फायरिंग झाले. आणि ते फायरिंग करणारे एका बाईकवर तीन इसम होते. त्यामध्ये दोन इसमांनी फायरिंग केले आणि त्यानंतर ते बाईकवर पळून गेले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या जवळपास 20 विशेष टीम्स बनवल्या गेल्या. आणि या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच ग्राउंड वर्कच्या बेसिसवर ती बाईक शोधून काढली, ज्या बाईकवर हे तीन जण गेले होते. ही बाईक आम्हाला अंधेरी रेल्वे स्टेशनला मिळाली. आम्ही दिलेल्या माहितीवर कोटा पोलिसांची कारवाई पुढे DCP राज तिलक रोशन यांनी सांगितले की, त्यानंतर अजून जे सीसीटीव्ही ॲनालिसिस वगैरे या बेसिसवर आम्हाला असं कळाले की ते पुढे नॉर्दर्न साईडला गेलेले आहेत, वेस्टर्न लाईनला आणि पुढील प्रवास करून ते सुरतच्या दिशेने गेलेले आहेत. या माहितीच्या आधारे आम्ही पुढे गेलो आणि त्यानंतर आम्हाला असे कळाले की पुणे-जयपूर एक्सप्रेसने ते पुढे गेलेले आहेत. आम्ही त्यामध्ये अचूक माहिती काढून तिथल्या कोटा पोलिसांना शेअर केली आणि त्या बेसिसवर त्यांनी तिथे त्यांना पकडले. आमची टीम त्यांचा पाठलाग करत होती आणि काही तासांचा गॅप होता. कोटा पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर आमची टीम तिथे पोहोचली आणि त्या तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘अटेम्प्ट टू मर्डर’ अंतर्गत गुन्हा दाखल तसेच पुढील तपास क्राईम ब्रांच करत आहे आणि हा तपास खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये ‘अटेम्प्ट टू मर्डर’ (हत्येचा प्रयत्न) हे सेक्शन लावण्यात आले आहे, तसेच ‘आर्म्स ॲक्ट’चे कलमही लावले आहे. यामध्ये जे काही आरोपी आहेत, प्राईमा फेसी (प्राथमिकदृष्ट्या) जे तीन जण स्पॉटवर होते, ते पकडले गेले आहेत आणि या व्यतिरिक्त जे कोणी यामध्ये असतील त्यांना आम्ही अटक करणार आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार, असे DCP राज तिलक रोशन यांनी स्पष्ट केले आहे.
Source link
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण:तीनही आरोपी ताब्यात, 'अटेम्प्ट टू मर्डर' अंतर्गत गुन्हा दाखल; DCP राज तिलक रोशन यांची माहिती