Headlines

मतविभाजनाच्या शक्यतेने वाढली धाकधूक‎, होम ग्राऊंडवर दत्तात्रय सावंत व डॉ. बी. पी. रोंगे यांच्यात रस्सीखेच‎




पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात एकूण ६१,९३२ मतदार असून, त्यापैकी सोलापूर जिल्ह्यात १५ हजार २९३ मतदार आहेत. पुणे जिल्ह्यानंतर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असल्याने या जिल्ह्यातील मतदानाकडे सर्वच उमेदवारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख उमेदवार दत्तात्रय सावंत आणि डॉ. बी. पी. रोंगे यांच्यामध्ये होम ग्राऊंडवर मतांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. या निवडणुकीत रासपचे उमेदवार दत्तात्रय सावंत, काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर, भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासह महायुतीचे बंडखोर डॉ. बी. पी. रोंगे, खंडेराव जगदाळे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे प्रमुख उमेदवारांसह बंडखोर उमेदवारांची भूमिका निकालाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हानिहाय मतदारसंख्या दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक २१५५ शिक्षक मतदार सर्वात कमी मोहोळमध्ये ७९८



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *