Headlines

उजनीत 21,000 जलवनस्पतींचे संवर्धन, 45 लाखांचे मत्स्यबीज, नामशेष होत चाललेल्या देशी माशांचे संवर्धन करणारा प्रकल्प- कृषिमंत्री भरणे‎




शेतकरी व मच्छिमारांठी वरदान ठरला असुन, उजनीतून अनेक देशी व माश्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत या नामशेष झालेल्या देशी माशांच्या प्रजाती बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माध्यमातून पुन्हा संवर्धन केल्या जात असल्याने गरीब मच्छिमारांचे सेवा करणारा प्रकल्प ठरू शकतो, असे मत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. उजनी पाणथळ क्षेत्राचे पर्यावरणीय वैभव टिकवण्यासाठी आणि मत्स्यव्यवसाय बळकट करण्यासाठी बीएनएचएस सोसायटी मुंबई आणि सिप्ला फाउंडेशनच्या माध्यमातून अंदाजे ४५ लाख खर्चाच्या देशी माशांच्या बोटकुलीसह २१,००० जलवनस्पतींचे संवर्धन करण्याचा प्रारंभ शनिवारी भरणे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे, सहायक संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे, उपसंचालक डॉ. सुजित नरवडे, डॉ. पी. सत्यासेल्वम, प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे तसेच जिल्हा परिषद सदस्य मेघना बंडगर, पंचायत समिती सदस्या हेमाताई माडगे, सचिन बोगावत, पराग जाधव, हनुमंत बंडगर, अशोक शिंदे, संपत बंडगर, गुराप्पा पवार, प्रशांत चवरे, प्रदीप वाकसे, अनिल नगरे आदीजण उपस्थित होते. बीएनएचएसचे शास्त्रज्ञ, कार्यक्रम प्रमुख डॉ. उन्मेश काटवटे म्हणाले, दख्खन महाशीरबरोबरच बोबरी,कवडस हे देशी मासे आणि रोहू, कटला, मृगल या जातींचे देखील माश्यांच्या बोटूकुली सोडण्यात आली. गेल्या काही दशकांत आक्रमक परकीय प्रजातींचा प्रसार, वाढते प्रदूषण आणि लहान जाळ्यांचा वापर करून केली जाणारी व्यावसायिक मासेमारी यांमुळे उजनी जलाशयाचे गंभीर पर्यावरणीय नुकसान होऊन ३० ते ३५ देशी माशांच्या प्रजाती स्थानिक दुर्मीळ व नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे बीएनएचएस या नामशेष झालेल्या प्रजाती पश्चिमेकडील हिरण्यकेशी, कोयना आणि पंचगंगा नद्यांमधून मूळ प्रजाती मिळवून यशस्वी प्रजनन केले आहे. यावेळी भरत मल्लाव, चंद्रकांत भोई,बाळासाहेब काळे,उज्वला परदेशी यांनी आपली मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमास शेकडो स्थानिक मच्छीमार, पर्यावरणप्रेमी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.यावेळी मच्छिमार संघटनेचे दिवंगत पदाधिकारी राहुल भोई यांच्या स्मरणार्थ देखील ५० हजार कटला जातीचे मासे सोडण्यात आले. | नामशेष झालेल्या दख्खन महाशीर पुन्हा उजनीत डॉ. उन्मेश काटवटे म्हणाले, भारतातील स्थानिक पातळीवर नामशेष झालेल्या गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजातींचा हा देशातील पहिलाच मोठा संवर्धन प्रजनन आणि पुनर्प्रवेश कार्यक्रम आहे. भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्राची जैविक साखळी पूर्ववत करण्यासाठी आणि डेक्कन महाशीरसारख्या प्रजातींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. दरम्यान १९९० च्या दशकापासून उजनीतून नामशेष झालेल्या ‘दख्खन महाशीर’ अर्थात खदारा या प्रसिद्ध माशाचे उजनीत संवर्धन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *