Headlines

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात:नळदुर्ग बायपासजवळ पायी जाणाऱ्या भाविकाला कंटेनरने उडवले, एकाचा मृत्यू, 6 जखमी




तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या भाविकांना पाठीमागून येणाऱ्या एका कंटेनरने धडक दिली. सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग बायपासजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बसवकल्याण येथून काही भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरच्या दिशेने पायी निघाले होते. दरम्यान, सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील नळदुर्ग बायपासजवळ आले असता, मागून आलेल्या भरधाव कंटेनरने या भाविकांना जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी कंटेनरखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. सोलापुरात वळसंगजवळ अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार सोलापुरात दुसऱ्या एका घटनेत रस्ते अपघातात हसापूरचा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोलापूर अक्कलकोट मार्गावर वळसंग सूत मिल जवळ मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली. शिवाजी मारुती वाघमारे (वय 46, रा. हसापूर ,ता. अक्कलकोट) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते मंगळवारी दुपारी अक्कलकोटकडून सोलापूरकडे मोटारसायकल वरून निघाले असताना वळसंग येथील सूत मिल समोर त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला. यात मार लागून ते जागीच मृत्यू होऊन पडले. ही माहिती वळसंग पोलिसांना समजली असता हवालदार एस. व्ही. कुंवर यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात दुपारी नेला. हे ही वृत्त वाचा

बहिणीला भेटण्यासाठी निघालेल्या भावाचा अपघातात मृत्यू:औसा- उमरगा महामार्गावरील फत्तेपूर पाटीजवळ अपघात, ट्रक चालकावर गुन्हा
लातूर येथे बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचा मालवाहू ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास औसा-उमरगा महामार्गावरील फत्तेपूर पाटीजवळ घडला. कुलदीप उद्धव माने (वय ३०, रा. बोळेगाव, ता. निलंगा) असे मृत तरुणाचे नाव आहे.वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *