Headlines

आमचा फेव्हिकॉलचा मजबूत जोड, महायुतीत फूट अशक्य:मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर नितेश राणेंची प्रतिक्रिया




मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत राज्यातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच राणे यांनी महायुतीमध्ये कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा केला. तसेच, मच्छीमार बांधवांना दिलासा देताना त्यांना लवकरच कृषी दर्जाचे सर्व लाभ मिळवून देण्याची मोठी घोषणाही त्यांनी केली. ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून पाहणार मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना नितेश राणे म्हणाले, “त्या क्लिपची पूर्णपणे चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. क्लिपची सत्यता, त्यातले संभाषण फॅब्रिकेटेड किंवा ‘एआय’ (AI) जनरेटेड आहे का? हे तपासून पाहिले जाईल. मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्याप्रमाणे याची सखोल चौकशी होईल. क्लिप कुठून आली आणि त्यात कोण आहे, या सर्व गोष्टींचा अहवाल आल्यानंतर आम्ही अधिकृत प्रतिक्रिया देऊ.” या क्लिपमुळे महायुतीत फूट पडेल का? या प्रश्नावर राणे यांनी मिश्किलपणे उत्तर दिले, “आमचा फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे. महायुती म्हणून आम्ही एकमेकांसोबत घट्ट उभे आहोत. त्यामुळे आमच्यात फूट पडण्याचा सवालच पैदा होत नाही.” बँकांच्या मनमानीला चाप लावणार शेतकरी आणि मच्छीमारांना केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) अंतर्गत कर्ज देताना बँकांकडून होणाऱ्या दिरंगाईवर नितेश राणे यांनी शब्दांत नाराजी व्यक्त केली. “क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारची योजना आहे. जर बँका आणि संबंधित अधिकारी या चौकटीत राहून मदत करत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद मूळ निर्णयात आहे. जे अधिकारी हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माझी आहे,” असा स्पष्ट इशारा राणे यांनी दिला. मच्छीमारांना कृषी दर्जाचे संपूर्ण लाभ मच्छीमारांना नुकसान भरपाई आणि सुरक्षिततेबाबत बोलताना राणे यांनी मोठी घोषणा केली. “मच्छीमारांना कृषीचा दर्जा दिल्यानंतर, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सवलती (उदा. वीज बिलात सवलत, किसान क्रेडिट कार्ड, इन्शुरन्स) मच्छीमारांनाही देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. लवकरच यासंदर्भात जीआर (शासनादेश) काढला जाईल. जेणेकरून अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये (जसे की मत्स्यबीज नष्ट होणे) शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही तत्काळ शासकीय मदत मिळेल,” असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला. ——————- हेही वाचा.. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतदान: 182 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार, कोण मारणार बाजी? 27 ऑक्टोबरला मतमोजणी
राज्यातील विधान परिषदेच्या बहुचर्चित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार, २३ ऑक्टोबर) मतदान पार पडत आहे. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) या विभागांमधील एकूण ५ मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होत असून, तब्बल १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. अनेक मतदारसंघांमध्ये प्रस्थापित विरुद्ध बंडखोर अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. २७ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *