Headlines

Raj Thackeray Slams Friendship File Controversy; Maharashtra Politics News


“राज्यात सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत असलेली ‘फ्रेंडशिप फाइल’ ही 29 मिनिटांची ऑडिओ क्लिप म्हणजे दुसरा तिसरा काही नसून थेट लोकशाहीचा खून आणि बलात्कारच आहे! 500 कोटी रुपयांच्या मुद्द्यावर खुलासे यायलाच हवेत, मात्र त्याहून अधिक गंभीर बाब म्हण

.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर आणि रोखठोक पोस्ट शेअर करत भाजपच्या सोशल मीडिया सेलची कार्यपद्धती, कथित 500 कोटींचा व्यवहार, सरकारमधील अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण यावर चौफेर तोफ डागली.

भाजपच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणाऱ्यांची ‘फ्रेंडशिप फाइल’!

आपल्या ट्विटमध्ये ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची पोलखोल करताना राज ठाकरे यांनी लिहिले, “सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ती तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. भाजपचे काही पदाधिकारी, पक्षाच्या सोशल मीडियात महत्त्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भाजपच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही यूट्यूब इन्फ्लुएन्सर्स यांच्यातील ही चर्चा आहे. यामध्ये कोणी कोणाला 500 कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना कशी जरब दाखवायची, एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणाचा नवीन मुद्दा कसा रेटायचा, याचे नियोजन उघडपणे ऐकायला येत आहे.”

माध्यमांवरील दडपशाहीवर चर्चा हवी

“ही क्लिप 29 मिनिटांची असून त्यातील 500 कोटींचा मुद्दा गाजतोय, त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भाजप ज्या पद्धतीने समाजमाध्यमे आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांवर दडपशाही आणत आहे, यावरही चर्चा व्हायलाच हवी.”

हा लोकशाहीचा खून, फॉरेन्सिक अहवालात गोल गोल घुमवू नका!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक अहवाल मागवल्याच्या विधानाचा समाचार घेताना राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये नमूद केले. “मुख्यमंत्र्यांनी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असे म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ-व्हिडिओच्या सत्यतेबरोबरच खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत पुराव्यांची सत्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरंतर यातले संभाषण ऐकले तर समजतेच की हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच आहे! जे बोलले गेले आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी झाली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरे झाले.”

शहा-काटशहाचे राजकारण

“पुराव्यातील तथ्य तपासाच, पण या संभाषणाबद्दल तुम्ही अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरू होते हेही तपासा. मुख्यमंत्री म्हणतात की ही क्लिप 2 वर्षांपूर्वीची असावी, मग ती आताच कशी आली आणि बाहेर आणली कोणी? यात नेहमीप्रमाणे सरकारमधले ‘शहा काटशहा’चेच राजकारण दिसत आहे. फॉरेन्सिकच्या नावाखाली जनतेला फिरवू नका; निष्पक्ष कारवाई करून दाखवा, अन्यथा तो तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल.”

पत्रकार परिषदेतून पाणी संकटावर इशारा

ट्विटसोबतच सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राज्यातील पाणी टंचाई आणि राजकीय लागेबांध्यांवर परखड भाष्य केले होते. “पाण्याचा वेडावाकडा उपसा असाच सुरू राहिला, तर नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालानुसार पुढील 15 ते 20 वर्षांत संपूर्ण मराठवाड्याचे वाळवंट होईल. हे वाळवंट पूर्ववत करायला 250 ते 300 वर्षे लागतील. कसलीही परवानगी न घेता शेकडो बोअरवेल खोदल्या जात आहेत, बिअरचे कारखाने सुरू आहेत आणि विहिरींचे पाणी टॅप वॉटर म्हणून विकले जात आहे.”

टँकर लॉबीचे मालक आमदार आणि मंत्रीच

“कल्याण-डोंबिवलीत आठवड्यातून 3 दिवस पाणी नसते, पुण्यात गुरुवारी पाणी नसते, तर जालन्यात तब्बल 15 दिवसांतून एकदा पाणी येते. रस्त्यांवर धावणाऱ्या हजारो टँकर्सचे अदृश्य मालक सर्वपक्षीय आमदार, मंत्री आणि नगरसेवकच आहेत. टंचाई टिकून राहिली तरच टँकर लॉबीचा व्यवसाय चालतो.”

नॅरेटिव्ह नियंत्रित करण्याचे षड्यंत्र

“मनोज जरांगे पाटील यांना आधी जवळ करायचे, नंतर त्यांच्याच विरोधात माणसे उभी करून सहकाऱ्यांमध्ये फूट पाडायची, हे कट कोण रचत आहे हे उघड आहे. ज्या दिवशी सत्ता जाईल, त्या दिवशी ही सर्व पापे यांच्या अंगाशी येतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

————————————————————

हेही वाचा…

रामदास कदम तुम्ही फोटोग्राफर होता काय?: एकनाथ शिंदेंना संपवण्याचे षड्यंत्र आम्ही नाही, तुम्हीच करताय; मनोज जरांगेंचा रामदास कदमांवर पलटवार

“मी वयाचा मान राखून आजवर शांत राहिलो, पण रामदास कदम यांनी पातळी सोडून माझ्या वैयक्तिक गोष्टींवर चिखलफेक करणे तत्काळ थांबवावे. आंतरवालीत आमच्याच आंदोलनात माणसे पेरून, आमच्या पाठीमागून फोटो गोळा करायला रामदास कदम तुम्ही काय फोटोग्राफर होता काय? एकनाथ शिंदेंचा केसाने गळा कापण्याचे काम आम्ही करत नसून, त्यांच्या पाठीशी साडेसाती लावून त्यांना संपवण्याचा कुटील डाव रामदास कदम तुम्हीच खेळत आहात. 500 कोटींचा आरोप करून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा जो कट सुरू होता, तो मी क्लिपच्या माध्यमातून बाहेर काढून उलट शिंदेंना सावध केले आहे. त्यामुळे कदमांनी आमच्या डोक्याला डोकं लावू नये आणि स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन थांबवावे,” असा जोरदार प्रतिहल्ला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी चढवला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.