Headlines

मविआचे 160 आमदार येणार असल्याचा IB चा अहवाल होता:बोगस मतदानाच्या मुद्द्यावरून नाना पटोले आक्रमक




आयबी आणि पोलिसांचा रिपोर्ट जसा सत्ताधाऱ्यांना जातो तसा आम्हालाही येत असतो. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 75 तर मविआचे 160 आमदार निवडून येतील असा रिपोर्ट आमच्याकडे होता, असा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. मी तर माझ्या मतदारसंघात प्रचाराला सुद्धा गेलो नाही. मी महाराष्ट्रभर फिरत होतो, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापेक्षा माझ्या सभा मोठ्या होत होत्या. कारण लोकांना परिवर्तन हवे होते. नाना पटोले म्हणाले की, पण मतदानात बेईमानी होणार हे आम्हाला कळालेच नाही. 2019 ते 2024 पर्यंत महाराष्ट्रात 50 लाख मते वाढली. वर्षांला जवळपास 10 लाख मते वाढली. लोकसभा निवडणुकीनंतर 46 लाख मते अवघ्या 4 महिन्यांमध्ये वाढली. एका इमारतीमध्ये 10 हजार मते वाढली. हे कोणते लोकं होते जे वाढले ते काही कळाले नाही. एसआयआरमध्ये जवळपास महाराष्ट्रातील अडीच कोटी मतदार कमी झाले ती लोकं कोण होती असा सवाल पटोले यांनी केला आहे. भाजपकडून निवडणूक आयोगामार्फत लोकशाहीची हत्या नाना पटोले म्हणाले की, एसआयआरमारर्फत स्वत:चे पाप लपवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. आपली मते कमी झाली नाहीत तर वाढलेले बोगस मतदार वाढले होते. निवडणूक आयोगाने आम्हाला कोणते मतदार वाढले ते सांगितले नाही. निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी 5 वाजेनंतर किती मतदान झाले याची माहितीच दिली नाही. दुसऱ्या दिवशी 3 वाजता ही माहिती समोर आली. यामध्ये 10 टक्के मतदान वाढवले. 76 लाख आणि 46 लाख मतदार वाढवत भाजपने निवडणूक आयोगामार्फत लोकशाहीची हत्या करण्याचे पाप केले. ..तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल नाना पटोले म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या झाडकापावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. या प्रकल्पासाठी 35 हजारांहून अधिक झाडे कापली जात आहेत. हा प्रकल्प चालवणारी टोरंट कंपनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मर्जीतील व्यक्तीची आहे. मोदी आणि फडणवीस सरकारला महाराष्ट्राचे वाळवंट करू देणार नाही. कर्जतमधील वृक्षतोड तात्काळ न थांबल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. हे ही वृत्त वाचा सरकार झोपलंय का?:सरकारने वेळीच आळा घातला नाहीतर रस्त्यावर उतरू, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या गुंडगिरीविरोधात रोहित पवार आक्रमक
मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली. सरकारने यात लक्ष घातलं नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत राहतील. आम्ही वारंवार सरकारला सांगूनही सरकारला ऐकू येत नसेल तर हे सरकार झोपलंय का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *