Headlines

Raj Thackeray Adani Documentary Controversy; Questions Maharashtra Leaders


राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या व्हिडिओला अवघ्या काही वेळात 48लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल

.

राज ठाकरे म्हणाले की, आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जात असताना राज्यातील खासदार-आमदार गप्प का? असा संतप्त सवाल विचारत त्यांनी सत्तेसमोर सरेंडर होणाऱ्या राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. डॉक्युमेंट्री डिलीट केली तरी देशाच्या प्रबोधनासाठी ला लावलेली ठिणगी आता वणवा बनली असून एकाधिकारशाहीविरोधातील लढा यापुढेही कायम राहील.

राज ठाकरेंची नेमकी पोस्ट काय?

गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला 48 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी 2026 ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं. त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो. या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी.

सत्तेसमोर इतकं शरण जाणं महाराष्ट्राच्या इतिहासाला शोभणारे नाही

राज ठाकरे म्हणाले की, पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे.आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो..

मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय

राज ठाकरे म्हणाले की, पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी.मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी 2026 च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलिस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलिस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच.

..जी आग लागायची ती लागली

राज ठाकरे म्हणाले की, ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी 2026 ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी 2026 ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी 2026 च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..

हे ही वृत्त वाचा

मविआचे 160 आमदार येणार असल्याचा IB चा अहवाल होता:बोगस मतदानाच्या मुद्द्यावरून नाना पटोले आक्रमक

आयबी आणि पोलिसांचा रिपोर्ट जसा सत्ताधाऱ्यांना जातो तसा आम्हालाही येत असतो. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 75 तर मविआचे 160 आमदार निवडून येतील असा रिपोर्ट आमच्याकडे होता, असा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. मी तर माझ्या मतदारसंघात प्रचाराला सुद्धा गेलो नाही. मी महाराष्ट्रभर फिरत होतो, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापेक्षा माझ्या सभा मोठ्या होत होत्या. कारण लोकांना परिवर्तन हवे होते. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.