Headlines

"तिसरी मुंबई’ ठरेल राज्याचे नवे ग्रोथ इंजिन- फडणवीस:नैना क्षेत्रामध्ये 15 लाख रोजगारांचे उद्दिष्ट




नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्राच्या (नैना) विकासातून १५ लाख रोजगार निर्माण करण्याचे मोठे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. यापैकी ५ लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. विशेष म्हणजे या रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधींमध्ये स्थानिक भूमिपुत्रांनाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून उभी राहणारी ही ‘तिसरी मुंबई’ विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी स्थानिकांना मालमत्ता पत्रकांचे वाटपही करण्यात आले. ९४ गावांचा कायापालट या प्रकल्पामध्ये एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट््स सिटी, एरोसिटी आणि नॉलेज सिटी यांसारख्या आधुनिक संकल्पना राबवल्या जाणार आहेत. सिडकोच्या माध्यमातून सुमारे २२५ चौरस किलोमीटर क्षेत्रातील ९४ गावांचा हा एकात्मिक विकास आहे. उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला यामुळे मोठी चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. विकास शुल्क असेल शून्य नैना क्षेत्रातील जमीनधारकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावताना शासनाने विकास शुल्क शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जमिनी ‘फ्रीहोल्ड’ करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. “ज्या भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी देऊन या विकासाचा पाया रचला त्यांना या विकासाचा योग्य लाभ मिळालाच पाहिजे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *