Headlines

सापतपालीमध्ये 70 गोण्यांतून दोन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती:गवराई महिला पथक‎, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे श्रमदान




सापतपाली येथील दगड्याचा माळ ओहोळावर वाहून जाणारे पाणी अडवून भूजलपातळीत वाढ करण्यासाठी जलमित्र संस्थेच्या १०१ वनराई बंधारा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. गावातील गवराई महिला पथक आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी ७० गोण्यांचा उपयोग करून दोन वनराई बंधारे तयार करण्यात आले. गवराई महिला पथकाच्या अध्यक्षा वेणूबाई गवळी आणि कल्पना कनोजे यांच्या हस्ते जलपूजन करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मुख्याध्यापक अमृत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना वनराई बंधाऱ्याचे महत्त्व, पाण्याची बचत, त्याचे फायदे आणि श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी शैलाबाई कनोजे, अनुसया गवळी, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. वनराई बंधारे बांधण्यासाठी जलमित्र पोपट महाले यांनी पुढाकार घेतला आहे. भूजलपातळीत वाढ व्हावी तसेच पाळीव जनावरांसह पशुपक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने ग्रामस्थांच्या श्रमदानातून ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे जलमित्र संस्थेचे अध्यक्ष पोपट महाले यांनी सांगितले. पाण्याचे महत्त्व ग्रामस्थांना पटल्याने गवराई महिला पथकाने वनराई बंधारा मोहिमेत सहभाग घेतला आहे. वाहून जाणारे पाणी अडवून भूजलपातळीत वाढ करण्यासाठी एक पाऊल टाकले आहे,” असे गवराई महिला पथकाच्या अध्यक्षा वेणूबाई गवळी यांनी सांगितले.या उपक्रमामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग जनावरांना पिण्यासाठी व होणार आहे. वनराई बंधारा बांधण्यासाठी ७० रिकाम्या गोण्यांमध्ये माती भरून पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी एकावर एक थर लावले जातात. जलमित्र पोपट महाले यांच्या संकल्पनेतून कोणताही खर्च न करता ही बंधारा निर्मिती केली जाते. पाण्याचा प्रवाह वाढल्यास गोण्यांमध्ये मुरूम-माती भरून गोण्यांची संख्या वाढवता येते. त्यामुळे अधिक पाणी अडवून साठवणे शक्य होते. या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग कपडे धुण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी करता येतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *