![]()
पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ग्रामीण भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. सध्या तालुक्यातील १४ गावे आणि नऊ वाड्या-वस्त्यांमधील ५२ हजार ५३४ नागरिकांची तहान २१ टँकरच्या ३७ खेपांद्वारे भागवली जात आहे. उन्हाळ्यापूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असताना आता पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत. जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात नागरिकांसह जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहणार आहे. लाडसावंगी, कोनेवाडी, हिरापूर, गोलटगाव, वडाचीवाडी, एकोड, एकोड तांडा क्रमांक एक, दोन व तीन, फत्तेपूर, रामपूर, शेकटा, बाळापूर वसाहत, दरकवाडी, कौटगाव-अंबड, कौटगाव-जालना आणि सांजखेड या भागांत सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विहिरी, तलाव आणि अन्य जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने नागरिकांना टँकरच्या खेपांची प्रतीक्षा करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रशासनाला सातत्याने नियोजन करावे लागत आहे. भांबर्डा-बनगाव परिसरातील लाहुकी मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २२ गावांवरही पाणीटंचाईचे सावट आहे. सध्या या गावांना पिण्याच्या पाण्याबाबत तात्पुरता दिलासा मिळत असला, तरी धरणातील पाणीसाठा मर्यादित आहे. त्यातच अवैध पाणीउपसा सुरू राहिल्यास डिसेंबरमध्येच या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते, पिण्याच्या पाण्याचा आवश्यकतेनुसार आढावा घेऊन नियोजन सुरू आहे Ãपाणीटंचाई असलेल्या गावांतील परिस्थिती आणि जलस्रोतांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जात आहे. काही ठिकाणी तलावातील अनधिकृत विद्युतपंप संबंधित विभागाच्या सहकार्याने काढून पाणी नागरिकांसाठी सुरक्षित केले जात आहे. गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. -शिवाजी साळुंके, गटविकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवण्यासाठी अवैध पाणीउपशावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना आणखी दहा गावांनी टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. कार्होळ, शेंद्राबन, शेंद्रा कमंगर, पिसादेवी, पाचोड, करंजगाव, चारठा, पिंपळगाव पांढरी, सहस्रमुळी आणि शिवाजीनगर-शेंद्रा कमंगर या गावांच्या प्रस्तावांवर निर्णय होणे बाकी आहे. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या गावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रस्तावांची तपासणी करून पुढील कार्यवाही होईल Ãटँकरची मागणी करणाऱ्या गावांच्या प्रस्तावांची नियमानुसार तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाते. पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. -शिवानंद बिडवे, तहसीलदार, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण
Source link
तालुक्यातील 52 हजार नागरिकांची तहान टँकरवर:21 टँकरच्या 37 खेपा, दहा गावांच्या प्रस्तावांवर शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा