Headlines

टोरेंट प्रकल्प 100% पर्यावरणपूरक असल्याचा दावा:कर्जतमधील वृक्षतोड प्रकरणातराजकीय हेतूने आरोप- फडणवीस




सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कर्जत तालुक्यात टोरेंट कंपनीचा ३ हजार मेगावॅट वीज उत्पादन प्रकल्प १०० टक्के पर्यावरणपूरक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, या प्रकल्पाला अभ्यासाविना विरोध होत आहे. विरोधामागे राजकीय हेतू आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले की, कागदावर कमी झाडे दाखवून प्रत्यक्षात ६ ते ७ लाख वृक्षांचा बळी दिला जातोय. मुख्यमंत्री म्हणाले की, ३,००० मेगावॅट कोळशाच्या विजेमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी २८ कोटी झाडांची गरज असते; ही प्रचंड हानी हा प्रकल्प टाळणार आहे. बॅटरी विरुद्ध पंप स्टोअरेज बॅटरी स्टोअरेजचे कमाल आयुष्य २५ वर्षे; कच्चा माल आणि सेलसाठी चीनवर अवलंबित्व आहे. पंप स्टोअरेजचे सरासरी आयुष्य ८० वर्षे; १००% स्वदेशी तंत्रज्ञान व दीर्घकालीन कार्बन मुक्ती. प्रकल्पासाठी अधिग्रहितपेक्षा दुप्पट जमीन वनीकरणासाठी. ६० हजार व अन्यत्र ९० हजार झाडे लावणार.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *