Headlines

माटेगाव चौफुलीवर कारची धडक; वृद्धाचा जागीच मृत्यू:पायी रस्ता ओलांडत असताना कारने दिली धडक




खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील माटेगाव चौफुलीवर झालेल्या अपघातात ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण देवा चव्हाण (६५, रा. भारंबा तांडा, ता. कन्नड) असे मृताचे नाव आहे. माटेगाव चौफुली ही अपघातांचे केंद्र बनले असून एका निष्पापाचा बळी गेल्याने ग्रामस्थांनी येथे उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० ते १ वाजेच्या सुमारास कन्नडकडून नगरकडे जाणारी कार (एमएच ५४ बी ३३०६) वेगाने जात होती. या वाहनाचा चालक चेतन रमेश महाजन (२६, रा. कुडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव) हा नगरकडे निघाला होता. त्याच वेळी माटेगाव चौफुलीवर लक्ष्मण चव्हाण हे पायी रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राकेश आव्हाड पुढील तपास करत असून, पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. माटेगाव येथील चौफुली ठरतेय मृत्यूचा सापळा माटेगाव चौफुली ही चार रस्त्यांचा वर्दळीचा चौक आहे. महामार्गावरील जड वाहने आणि स्थानिक रहिवाशांच्या वाहतुकीमुळे येथे नेहमी गोंधळ असतो. गतिरोधक, दिशादर्शक फलक किंवा वाहतूक पोलिस नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. यापूर्वीही अनेक बळी गेले असून येथे उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *