Headlines

Pune Teacher Constituency Election: Sachin Sanap Reaction


शिक्षकांनी जो कौल दिला आहे, तो आपण सर्वांनी पूर्ण आदराने स्वीकारला पाहिजे. तांत्रिक गोष्टी अनेक असू शकतात, परंतु या पराभवात कुठेही काही कमी पडलो असेन, तर ती माझी स्वतःची जबाबदारी आहे, असे पुणे शिवसेनाप्रणीत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांनी म्हटले आहे.

.

सचिन सानप म्हणाले की, पुणे शिक्षक मतदारसंघात मुख्य लढत माझ्यामध्ये आणि भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यातच थेट रंगली होती. शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असावा या भूमिकेसाठी आम्ही हा लढा उभारला होता. आज जरी यश मिळाले नसले, तरी येणाऱ्या काळात शिक्षकांना नक्की जाग येईल आणि ते या लढ्यात पूर्ण ताकदीने सामील होतील. येत्या काळात विजय मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न अधिक तीव्र असतील.

एकनाथ शिंदेंचे आभार

सचिन सानप म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि पक्षाने ऐनवेळी मला दिलेला पाठिंबा अत्यंत मोलाचा होता. त्यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, किरण सामंत, शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले.

पराभवाची कारणे काय सर्वांना माहिती

सचिन सानप म्हणाले की, या निवडणुकीत दोन-दोन माजी आमदारांना पराभवाचा धक्का बसला आहे. प्रत्येकाने आपली स्वतःची तयारी केली होती, त्यामुळे कोणाचा फटका कोणाला बसला असे म्हणता येणार नाही. पराभवाची कारणे काय आहेत आणि या निवडणुकीत कशा पद्धतीने गोष्टी घडल्या, हे सर्वांनाच ठाऊक आहे.

शिक्षकांना बदनाम करू नका

सचिन सानप म्हणाले की, विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदन. आमचा शिक्षकांसाठीचा लढा यापुढेही अविरत सुरूच राहील. निवडणुकीतील हार-जीत वेगळी, परंतु या राजकीय वादात कोणीही शिक्षकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये.

हे ही वृत्त वाचा मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर:पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आले नसले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.

दरम्यान, मतपत्रिकांची मोठी संख्या, सरमिसळ व पसंतीक्रमाची गुंतागुंतीची प्रक्रिया, विजयासाठी मतांचा कोटा निश्चित करणे आणि प्रथम पसंतीची मते मोजण्याचे काम उशिरापर्यंत सुरू असल्याने अंतिम चित्र स्पष्ट झालेले नव्हते. ज्या 5 मतदारसंघांत ही निवडणूक झाली तेथे 2020 मध्ये भाजपला एकही जागा मिळालेली नव्हती. सर्वपक्षीय बंडखोरांमुळेही ही निवडणूक चुरशीची झाली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.