![]()
नादुरुस्त ट्रकला दुचाकी धडकल्याने प्रविणकुमार योगराज वालदे (२७) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले मित्र सौरभ तोडासे (२०) गंभीर जखमी झाले. मंगळवारी रात्री पांढुर्णा गावाजवळ जबलपूर-हैदराबाद महामार्गावर हा अपघात झाला. प्रविणकुमार आणि सौरभ गोंदिया जिल्ह्यातील पानगाव येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. विधी आटोपून ते दुचाकीने नागपूरच्या दिशेने परतत होते. रात्री साईयोग वॉशिंग सेंटरसमोर त्यांची दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकच्या मागील भागावर आदळली. अंधारामुळे ट्रकचा अंदाज आला नसल्याचे वृत्त आहे. प्रविणकुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील धर्मेंद्रकुमार शालिकराम चौरसिया (३०) यांचा ट्रक महामार्गावर नादुरुस्त झाल्याने उभा होता. मागून येणाऱ्या वाहनांना सावध करण्यासाठी ट्रकजवळ धोक्याची चिन्हे लावली होती की नाही, याचा तपास सुरू आहे. जखमी सौरभ यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. लुमेश सुधाकर जांभूळकर (२५) यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी ट्रकचालक धर्मेंद्रकुमार चौरसिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.
Source link
नादुरुस्त ट्रकला दुचाकी धडकली; तरुणाचा मृत्यू:मित्र गंभीर जखमी; पांढुर्णाजवळ जबलपूर-हैदराबाद महामार्गावर अपघात