![]()
येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (स्वाराती) नेत्र विभागात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ४ रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग होऊन त्यांची दृष्टी अधू झाल्याचा धक्कादायक प्रकार १० दिवसांनंतर समोर आला आहे. २५ पैकी १७ रुग्णांवर १७ ऑ
.
७ दिवस उपचार, तरीही त्रास
हा प्रकार लक्षात आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सुरुवातीला लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांना बोलावले. त्यांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना तातडीने जालना येथील गणपती नेत्र रुग्णालयात हलवले. तेथे ७ दिवस उपचारानंतर रुग्णांना घरी सोडले. पण रुग्णांची दृष्टी पूर्ववत झाली नसून सध्या औषधे व ड्रॉप दिले जात आहेत. पुढील तपासणी लातूर व अंबाजोगाई येथे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संसर्गामुळे प्रकार, कारणांचा शोध सुरू…
शस्त्रक्रियेच्या दिवशी सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नेत्रस्वच्छता व संसर्गासंदर्भातील तपासणी करण्यात आली होती. मात्र, बाधित रुग्णांच्या डोळ्यांपर्यंत संसर्ग कसा पोहोचला याचा शोध घेतला जात आहे. यासाठी रुग्णांची तपासणी करून कारण शोधले जात आहे. – डॉ. ज्ञानोबा दराडे, नेत्र विभागप्रमुख, स्वाराती रुग्णालय