Headlines

घृष्णेश्वराचे श्रावणात भुयारी मार्गाने अडीचऐवजी तासाभरात दर्शन होणार:सिमेंटऐवजी दगड-चुन्याचा वापर; 70% काम पूर्ण, उर्वरित जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण होईल



नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर १२वे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर (वेरूळ) विकास आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. घृष्णेश्वराचे श्रावणात भुयारी मार्गाने अडीचऐवजी तासाभरात दर्शन होणार आहे. या २१० कोटींच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ये

.

मंदिराचा १३.२ एकर परिसर अतिक्रमणमुक्त करून एकूण २० एकरांत भाविकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा उभारल्या जात आहेत. आतापर्यंत ७०% काम पूर्ण झाले. जानेवारी २०२७ पर्यंत हे उर्वरित काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सोलार स्ट्रीट लाइट, अंतर्गत रस्ते, दगडाची संरक्षक भिंत, पाण्याची सोय, दगडी पाथवे, वेस्ट मॅनेजमेंट आदी कामे केली जात आहेत.

३०० वर्षांचे आयुष्य

सिमेंटऐवजी चुना-विटांनी हेरिटेज बांधकाम भक्तनिवास : ३५ खोल्यांचे नवे भक्तनिवास. सध्या भक्तनिवास नाही रोजगाराची हमी : बेल, फूल, क्राफ्ट व फूड विक्रेत्यांसाठी १७२ स्टॉल्स वाहतूक कोंडी : १६०० मीटरचा ‘वेरूळ बायपास’ महिनाभरातच खुला होणार पार्किंग : ६६२ वाहनांसाठी पार्किंग. सध्या मोकळ्या जागेवर १०० वाहनांची सोय पाणी : ३५ हजार लिटरची टाकी व आरओ उभारणार. सध्या लहान टाकीतून व्यवस्था

दर्शनरांग : १५२.२५ मी. लांबीची दर्शनरांग करण्यात येणार असून एका तासात दर्शन होईल. सध्या श्रावण महिन्यात दर्शनासाठी सुमारे अडीच तास लागतात.

उद्यान : उद्यानात चिंच, कांचन, बहावा, सोनचाफा आदी १५ प्रकारच्या झाडांची लागवड केली जाईल. उद्यानात ‘बोलार्ड’ व ‘अपलिफ्टर’ दिव्यांची रोषणाई केली जाईल.

पदपथ : ३६१७.१८ चौ. मी. क्षेत्रावर प्रशस्त पदपथ तयार केले जातील. या पदपथांवर बेसॉल्ट दगडांचे पेव्हिंग वापरले जाईल. पदपथ साधारणपणे ४ मीटर रुंद असतील.

प्रवेशद्वार : ७६.५० चौ. मीटर जागेत भव्य प्रवेशद्वार उभारले जाईल. शिखरासह त्याची उंची १०.२५ मीटर असेल. यावर दगडी पोत असलेल्या कमानी, खांब, शिखर असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *