Headlines

पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी, पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी




येथील रेल्वे गेटवरील वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असून, यामुळे वाहनधारक, व्यापारी, शेतकरी आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या येथे रेल्वे दुहेरीकरणासह उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी आठ ते दहा महिने लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत ही वाहतूक कोंडी कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिल्लेगाव पोलिसांनी तातडीने वाहतूक नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. लासूर स्टेशनच्या बाजारपेठेत ५० गावांतील नागरिक आणि शेतकरी खरेदी-विक्रीसाठी येतात. त्यातच लासूर बाजार समितीची मोठी अडत व धान्य बाजारपेठ रेल्वे गेटलगत असल्याने दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. रेल्वे येण्याच्या वेळी गेट बंद होताच दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यातच रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी ही समस्या अधिक तीव्र बनते. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढत असताना वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. लवकर जाण्याच्या घाईत काही दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने मार्ग काढत असल्याने कोंडी अधिकच विक्राळ रूप धारण करते; यातून वाहनधारकांमध्ये रोज वादाचे प्रकारही घडत आहेत. तसेच व्यापाऱ्यांना बँक व्यवहारांसाठी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे गेट परिसरात पोलिसांची नियुक्ती करावी, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांना आळा घालावा अशी मागणी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *