Headlines

सिल्लोडमधील वॉटरग्रीडच्या कामांना गती देण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश:मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडली बैठक



सिल्लोड तालुक्यात दुष्काळाची भीषणता लक्षात घेता भविष्यात भेडसावणारी संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी तालुक्यातील बहुचर्चित वॉटरग्रीड योजनेची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करा, असे स्पष्ट आणि कडक निर्देश राज्याचे पा

.

मुंबई येथील मंत्रालयात बुधवार (२८ ऑक्टोबर) रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सिल्लोड तालुक्यातील प्रलंबित वॉटरग्रीड योजनेची कामे वेगाने पूर्ण करणे, सोयगाव तालुक्यात पाणीपुरवठ्यासाठी नवीन वॉटरग्रीड योजना राबविण्याबाबतचा प्रस्ताव सादर करणे, तसेच जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा लेणी आणि फर्दापूर परिसरातील पाणीपुरवठ्याच्या बिकट समस्यांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.

या मागणीची गांभीर्याने दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुष्काळात नागरिकांचे हाल होण्यापूर्वीच प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे आयुक्त पराग जैन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमोल रमा नायक, अधीक्षक अभियंता दीपाली देशपांडे, सहसचिव अनिल धस, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद रूपनर, पर्यटन विकास विभागाचे महाव्यवस्थापक शेखर जैस्वाल, मुख्य अभियंता मनीषा पालांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी आणि सिल्लोड पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आप्पासाहेब काटकर आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

तालुक्यातील १०७ गावांची तहान भागवणारी वॉटरग्रीड योजना आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून सिल्लोड तालुक्यातील १०७ गावांच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी वॉटरग्रीड योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी काही तांत्रिक व प्रशासकीय कामे अद्याप प्रलंबित आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती आहे. अशा काळात ही योजना सुरू झाल्यास गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटेल, तसेच शासनावरील टँकरचा ताण व खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल, याकडे आमदार अब्दुल सत्तार यांनी बैठकीत लक्ष वेधले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *