![]()
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने युतीचा धर्म न पाळल्याचा थेट आरोप भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. विधान परिषदेच्या पाच जागांच्या निकालानंतर पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याने एकजुटीला धक्का बसल्याचे सांगत, भाजपने पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडले. पुणे पदवीधरमध्ये शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव, नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे वंजारी, मराठवाडा पदवीधरमध्ये शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे तर अमरावतीत शिवसेनेचे सरनाईक विजयी झाले. शिवसेनेने सहकार्य केले असते तर पाचही जागांवर महायुतीचा विजय सुकर झाला असता , असा दावा नवनाथ बन यांनी केला. नवनाथ बन पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केल्याचा फटका बसला. एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने महायुतीचे नुकसान केले असा आरोप बन यांनी केला आहे. नवनाथ बन यांचे ट्विट काय? नवनाथ बन म्हणाले की, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला. ..तर पाचही जागावर महायुतीचा विजय झाला असता नवनाथ बन म्हणाले की, शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही. हे ही वृत्त वाचा विधान परिषद निकाल:सतीश चव्हाणांचा 18 वर्षांचा गड का ढासळला? मतदारांचा रोष अन् रीलस्टार साबळे, कराळे मास्तरांनी कसे फिरवले विजयाचे गणित? 5 जागांचे सविस्तर विश्लेषण
विधान परिषदेच्या पाचही जागांचे निकाल जाहीर झाले. त्यात पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव, पुणे शिक्षक – भाजपचे कौस्तुभ गावडे, अमरावतीत शिवसेनेचे सरनाईक, नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे वंजारी आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील १८,१२४ मतांनी विजयी झाले.वाचा सविस्तर
Source link
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही:पुण्यात सानप यांना पाठिंबा अन् संभाजीनगरमध्ये विरोधामुळे पराभव- नवनाथ बन