महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत पदवीधरांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना नाकारले आहे. शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक झाली ती संस्थाचालकांनी जिंकली, त्यामध्ये शिक्षक किती आहेत? संस्थाचालकच या निवडणुकीत विजयी होतात, कारण यामध्ये पैशाचा म
.
संजय राऊत म्हणाले की, ठाणे काय कोणाच्या वडिलांचे नाही, आम्ही 3 वाजता ठाण्यात जात आहोत. पूर्णेकरांच्या हत्येची सुपारी कोणी दिली हे विचारणे म्हणजे तुमच्या नेत्याची बदनामी आहे का? तुम्हाला ते का टोचत आहे? ज्या मुलाने आपले वडील गमावले, त्यांच्या पाठीशी न्यायासाठी उभे राहणे आमचे कर्तव्य आहे. आम्ही ठाण्यात जाणारच आहोत, तुम्ही काय करणार? विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना जर सत्ताधारी ‘बघून घेऊ’ अशी भाषा वापरत असतील आणि धमक्या देत असतील, तर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, तसेच ठाण्याच्या पोलिस आयुक्तांचीही बदली केली पाहिजे.
याला थिल्लरपणा म्हणतात
संजय राऊत पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक अत्यंत मिश्कील पोस्ट करत देशभरात निवडणूक झालेल्या 28 जागांमध्ये काँग्रेस कुठे आहे का? असा सवाल केला होता. पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीने अशी पोस्ट करून देशातील प्रमुख विरोधी पक्षाची खिल्ली उडवणे याला थिल्लरपणा म्हणतात, असा टोला राऊत यांनी लगावला. पण पुढच्या दोन तासांतच नागपुरात भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेकांना आपले आधीचे ट्विट डिलीट करावे लागले.

वाराणसी-नागपुरात भाजपचा पराभव
संजय राऊत म्हणाले की, वाराणसी आणि नागपुरात भाजपचा पराभव झाला, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील पदवीधरांनी महायुतीला नाकारले आहे. महाराष्ट्रातील तिन्ही प्रमुख मतदारसंघांतील शिक्षित मतदारांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना नाकारले आहे. पंतप्रधानांनी असे ट्विट करणे योग्य नाही, हे चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली आणि भाजपचा पराभव झाला. त्यामुळे भाजपला आता आत्मचिंतनाचे अपचन झाले आहे.
आमची भूमिका चुकीची नव्हती
संजय राऊत शेवटी म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या वाटेला अमरावतीची जागा यायला हवी होती. इतर दोन ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार असले, तरी अमरावतीमध्ये ती स्थिती नव्हती. त्यामुळे ती जागा आम्हाला मिळावी ही आमची भूमिका चुकीची नव्हती, याची नोंद घेतली जाईल. प्रफुल्ल पटेल यांना जर आत्मचिंतनाची गरज वाटत असेल, तर त्यांनी ते जरूर करावे. महाराष्ट्रातील पदवीधर निवडणुकीत सुशिक्षित पदवीधरांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना नाकारल्याचेच दिसून येत आहे.
हे ही वृत्त वाचा
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही:पुण्यात सानप यांना पाठिंबा अन् संभाजीनगरमध्ये विरोधामुळे पराभव- नवनाथ बन

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने युतीचा धर्म न पाळल्याचा थेट आरोप भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. विधान परिषदेच्या पाच जागांच्या निकालानंतर पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याने एकजुटीला धक्का बसल्याचे सांगत, भाजपने पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडले. पुणे पदवीधरमध्ये शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव, नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे वंजारी, मराठवाडा पदवीधरमध्ये शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे तर अमरावतीत शिवसेनेचे सरनाईक विजयी झाले. शिवसेनेने सहकार्य केले असते तर पाचही जागांवर महायुतीचा विजय सुकर झाला असता , असा दावा नवनाथ बन यांनी केला. वाचा सविस्तर