Headlines

Eknath Shinde Slams Sanjay Gaikwad Over Farmer Suicide Statement


आपल्या वादग्रस्त आणि वादळी विधानांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावर बोलताना आमदार गायकवाड यांनी केलेल्या अत्यंत संतापजनक आणि असंवे

.

एका बाजूला राज्य शासन आणि शिवसेना दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना थेट मदतीचा हात देत असताना, आमदारानेच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याने महायुतीसह विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

आत्महत्येवर जाऊ नका; काय म्हणाले होते संजय गायकवाड?

बुलढाण्यात शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवर पत्रकारांशी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत उद्विग्न आणि वादग्रस्त शब्दांत टिप्पणी केली होती. “शेतकरी कसलाही विचार न करता स्वतःच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतात. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आमदार किंवा खासदारांना चिठ्ठी लिहून आपल्या अडचणी सांगितल्या पाहिजेत, आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून त्यांची मदत करू.”

अंत्यविधीवर न जाण्याचे आवाहन

“शेतकरी कुटुंबाचा विचार न करता टोकाचे पाऊल उचलतात, त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या मौतीवर (अंत्यविधीला/संस्काराला) कोणीही जाऊ नये,” असे वादग्रस्त वक्तव्य गायकवाड यांनी केले होते. या विधानानंतर विरोधी पक्षांसह भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही गायकवाड यांना ‘विकृत मानसिकतेचा माणूस’ म्हणत शिंदेंनी त्यांना आवरावे अशी जाहीर मागणी केली होती.

शेतकरी आमचा अन्नदाता, अपमान सहन करणार नाही

संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. “शेतकरी हा देशाचा आणि राज्याचा पोशिंदा आहे. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रत्येक संकटात खंबीरपणे धावून जाते. अशा वेळी पक्षाच्या आमदाराने अन्नदात्याचा अपमान करणे अक्षम्य आहे,” अशा शब्दांत शिंदेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षातील इतर नेते आणि कार्यकर्त्यांनीही गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केल्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम

शिवसेनेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व्यापक मदत मोहीम हाती घेतलेली असतानाच हा वाद उफाळला. शेतकरी कुटुंबांतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी करण्यासाठी 25,000 शिलाई मशिन्सचे मोफत वाटप सुरू करण्यात आले आहे, तर शेतकऱ्यांच्या मुलींसाठी शिक्षणाच्या सोयीसाठी 25,000 सायकलींचे वाटप केले जात आहे.

अन्नधान्याचे शेकडो ट्रक रवाना

दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त भागासाठी तब्बल 100 ट्रक अन्नधान्य पाठवण्यात आले होते, तर नुकतेच धारावी आणि इतर भागांतून आणखी 24 ट्रक धान्य व फराळ रवाना करण्यात आले आहे. एवढे मोठे मदतीचे कार्य सुरू असताना गायकवाड यांच्या वक्तव्याने पक्षाची बदनामी झाल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.

ठाण्यात मीनाक्षी शिंदे, तर बुलढाण्यात संजय गायकवाड; शिंदे सेनेची कोंडी

गेल्या 24 तासांत शिवसेनेच्या (शिंदे गट) अंतर्गत राजकारणात लागोपाठ दोन मोठे हादरे बसले आहेत. ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे पक्षावर प्रचंड दबाव वाढला होता. अखेर पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. त्या आता केवळ ठाणे महापालिकेच्या नगरसेवक पदापुरत्या मर्यादित राहतील.

गायकवाडांवर कारवाई अटळ?

मिनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर आता शेतकरीविरोधी वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गाची नाराजी ओढवून न घेण्यासाठी पक्षनेतृत्व गायकवाड यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

——————————————————————————-

हेही वाचा…

उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त तर एकनाथ शिंदे विचारांचे वारसदार: भविष्यात दोघे एकत्र येऊ शकतात; रवींद्र धंगेकरांचा मोठा दावा

नुकत्याच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. या तिन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर आता शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी एक अतिशय मोठा दावा केला आहे. “उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या विचारांचे वारसदार आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते, त्यामुळे हे दोन्ही नेते (ठाकरे-शिंदे) भविष्यात एकत्रही येऊ शकतात,” असे विधान धंगेकर यांनी केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.