![]()
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला रंगांची साथ मिळाली आणि कागदावर एकाहून एक सुंदर चित्रे साकारली! नवनीत पब्लिकेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘ऑल इंडिया नवनीत ड्रॉइंग कॉम्पिटिशन’ श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राथमिक विभागात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीच्या ७२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. स्पर्धेचे तीन गटांत आयोजन करण्यात आले होते. गट ‘अ’ (केजी ते पहिली) मधून प्रत्युष लासुरे, रुद्रांश मौर्य आणि सिया लोढा यांनी यश मिळवले. गट ‘ब’ (दुसरी ते चौथी) मधून काव्या गोंदकर, ऋषिकेश बनकर, श्रेयस रनमाळे, ज्ञानदा देवगुणे, स्वरांजली डांगे, साईश तुरकणे, ईश्वरी गुंजाळ, राजवर्धिनी म्हस्के आणि वेद कुलकर्णी यांनी यश संपादन केले. गट ‘क’ (पाचवी ते सातवी) मधून श्रेयस वाणी, मितेश जगधने, सुरभी बनकर, चैतन्य वाणी, अक्षदा खरात, सार्थक राहणे आणि लावण्या मोरे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यशस्वी विद्यार्थ्यांना नवनीत पब्लिकेशनच्या वतीने आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी कला अध्यापक हेमंत गीते, मुख्याध्यापिका शिल्पा पुजारी आणि प्रभारी प्राचार्या स्वप्ना जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. समितीतील सोनिया ठोकळ, वैजयंती गजरे, विजय हाटकर, शेखर पवार, विकास निर्मळ यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
Source link
चित्रांच्या रंगांतून 720 विद्यार्थ्यांनी खुलवली कल्पनाशक्ती!:चित्रकला स्पर्धेत साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग