![]()
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान कुडलसंगमचा (दक्षिण सोलापूर) विकास आणि हत्तूर परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या कामांबाबत सोलापूर जिल्हा परिषदेने विषय सर्वसाधारण सभेपुढे आणला आहे. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी अध्यक्ष दीपक अरुण वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या प्रमुख विकासकामांना अंतिम मंजुरी मिळणार आहे. यासोबतच माध्यमिक शाळेत ग्रंथालय करण्यासाठी प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाने ठेवला आहे. श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान कुडल संगम येथे भाविकांच्या सोयीसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बाधित झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी जागा खरेदी करणे, सन २०२६-२७ या वर्षासाठी माध्यमिक शाळांमधून पुस्तकपेढ्या सुरू करण्याच्या योजनेसाठी मंजूर ६५.०० लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणे याशिवाय जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांकरिता औषधे, औषधी साहित्य व उपकरणांच्या खरेदी तसेच सोळाव्या वित्त आयोगाच्या सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाच्या आराखडा याबाबत चर्चा होणार आहे. संरक्षक भिंत बांधणे, मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे, आधुनिक शौचालय उभारणे आणि अन्नछत्रासाठी स्वतंत्र किचन शेड बांधण्याच्या कामाला सर्वसाधारण सभेत मंजुरी दिलीजाईल. यासोबतच हत्तूर ते आनंदनगर तांडा दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण आणि पुलाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे.
Source link
हत्तरसंग कुडलच्या सुशोभीकरणास मिळणार गती:संगमेश्वर देवस्थान व हत्तूर परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार