![]()
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील अकराही तालुक्यांमधील मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत सुरू असून मतदारांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 2,020 मतदारांपैकी 413 मतदारांनी (20.44%) मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 389 पुरुष आणि 24 महिला मतदारांचा समावेश आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक 125, तर पाटण तालुक्यात 96 मतदारांनी सुरुवातीच्या दोन तासांत मतदान केले. तालुकाहाय मतदान आकडेवारी सातारा 46
जावली 2
महाबळेश्वर 29
कराड 15
पाटण 96
कोरेगाव 13
खटाव 18
माण 50
खंडाळा 5
वाई 14
फलटण 125 एकूण 413
महिला 24
पुरुष 389 कडक नियमावली आणि ओळखपत्र सक्तीचे मतदान केंद्रावर फक्त उमेदवार, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी आणि मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनाच प्रवेश दिला जात आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विहित केलेल्या १४ ओळखपत्रांपैकी किमान एक मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. मूळ ओळखपत्राशिवाय कोणालाही मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाने दिली आहे. पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी सातारा पोलिस प्रशासनाच्या वतीने सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे ही वृत्त वाचा
भाजपने ‘रामराज्या’च्या नावाखाली ‘रावणराज्य’ आणले- संजय राऊत:म्हणाले- बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांनी मला घडवले, वेळप्रसंगी कानही पकडले
बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर 40 वर्षे काढणे काही सोपी गोष्ट नाही. बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते. माझ्या घरात माझ्या जन्मापासून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कायम आहे हे मी पाहत आलो आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत त्यांच्या बरोबरीने माझा प्रवास झाला आहे. मला बाळासाहेब ठाकरेंनीच प्रत्येक वेळी नोकरीला लावले आहे, पण माझा बंडखोर स्वभाव असल्याने ते चिडायचे, ते आमचे हेडमास्तर होते, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनी एखाद्या व्यक्तीवर चिडणे हे त्या व्यक्तीचे महत्त्व अधोरेखित करते, ते चिडले याचा अर्थ त्यांचा आशीवार्द आहे. बाळासाहेब ठाकरे माझ्यावर चिडले असतील तर तो माझा गौरव आहे. त्यांनी मला लिहायला शिकवले आहे. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांनी मला घडवले आहे. त्यासाठी आपल्या विद्यार्थ्याचा कान पकडावा लागतो त्यांचा तो अधिकार असतो त्यांनी तो गाजवला याचा मला आनंद आहे. वाचा सविस्तर
Source link