![]()
कन्नड तालुक्यातील हतनूर येथील २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि .०१) पहाटे उघडकीस आली. महेश बाबासाहेब कळान्से (२७, रा. हतनूर, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश कळान्से हा नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास होता. दसरा सणानिमित्त तो गेल्या आठवड्यातच गावी आला होता. शनिवारी रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. रविवारी पहाटे वडील त्याला उठवण्यासाठी खोलीजवळ गेले असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता महेश लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. त्यानंतर महेशला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, हतनूर दूरक्षेत्रचे अंमलदार किरण गंडे, शिवदास बोराडे, पोलिस मित्र संतोष ढोले यांनी घटनास्थळी धाव घेत. घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेची कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले. आले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ व भावजय असा परिवार आहे. वडील त्याला उठवण्यासाठी गेले असतात्याने प्रतिसाद दिला नाही. त्यांनी खिडकीतून डोकावल्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले.