Headlines

विरोधकांना मुद्दे मिळत नाहीत, म्हणून ते मला टार्गेट करतात:अमृता फडणवीसांचा विरोधकांना टोला; राज ठाकरेंच्या विधानावरही स्पष्ट केले मत




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून सातत्याने टार्गेट केले जात असल्याच्या प्रश्नावर, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे. “देवेंद्रजींवर टीका करण्यासाठी जेव्हा विरोधकांना काही मुद्दे मिळत नाहीत, तेव्हा त्यांना त्यांची बायको भेटते,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. प्रभात प्रतिष्ठान आणि किशोरजी यांच्या पुढाकाराने आयोजित एका भाऊबीजेच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी मदत, राज ठाकरेंचे मिश्किल विधान आणि महिला मुख्यमंत्री यासारख्या अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर मनमोकळी उत्तरे दिली. ‘विरोधकांना मुद्दे मिळत नाहीत, म्हणून बायकोला टार्गेट करतात’ देवेंद्र फडणवीसांना सातत्याने टार्गेट केले जात असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “नक्कीच त्यांना टार्गेट केले जाते. पण जेव्हा त्यांना टार्गेट करण्यासाठी काही मुद्दे भेटत नाहीत, तेव्हा त्यांना त्यांची बायको भेटते. प्रत्येक गोष्टीवर त्यांना नक्कीच टार्गेट केले जाते. आजकाल विरोधकांकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत, त्यामुळे जे लोक सुरळीतपणे काम करत आहेत, त्यांच्यात अडथळे आणण्याचे काम केले जात आहे.” राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया संजय राऊत यांच्या नुकत्याच झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांना उद्देशून केलेल्या मिश्किल टीकेबाबतही अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या हसून म्हणाल्या, “राज ठाकरेंना आपली स्टेटमेंट हेडलाईन कशी करायची, हे अतिशय चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण असे काही नाहीये, आतल्यात सगळं छान चालू आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात, पण वैयक्तिक पातळीवर कोणीही आपले शत्रू बाळगायला नको.” शेतकऱ्यांची दिवाळी आणि ५ हजारांची मदत शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांना मिळणाऱ्या ५ हजार रुपयांच्या मदतीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “शेतकरी अडचणीत असतील, तर आपल्याही दिवाळीत एक खडा पडतोच. दिवाळीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ५ हजार रुपये ही एक मदतीची प्रक्रिया आहे. याव्यतिरिक्त त्यांचे जीवन सुखद व्हावे आणि कृषी उत्पादनात वाढ व्हावी यासाठी सरकार अनेक प्रक्रियांवर काम करत आहे. मात्र, केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न राहता समाजातील एनजीओ आणि आपण स्वतःहूनही शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.” ‘राज्याच्या सर्वोच्च पदासाठी जातीचे किंवा स्त्रीचे आरक्षण नको, गुणवत्ता महत्त्वाची’ महाराष्ट्रात अद्याप एकही महिला मुख्यमंत्री का झाली नाही? या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी अत्यंत रोखठोक मत मांडले. “राजकारण हे लोकांच्या भल्यासाठी असते. टॉप पोझिशनवर बसणारी व्यक्ती महिला आहे की पुरुष, हे पाहू नये. जर एखादी स्त्री पुढे आली आणि तिने चांगली कामे केली, तर नक्कीच तिला ते स्थान मिळेल. परंतु, अशा सर्वोच्च पदांवर आरक्षण देण्यापेक्षा पूर्णपणे गुणवत्ताच्या आधारावरच माणसांची निवड झाली पाहिजे, कारण त्यांच्या निर्णयाचा थेट परिणाम लोकांवर होत असतो,” असे त्या म्हणाल्या. निवडणूक आयोग आणि मतदार यादीतील गोंधळ विरोधकांकडून मतदार याद्यांमधून नावे वगळल्याच्या आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावर होत असलेल्या आरोपांवरही त्यांनी मत व्यक्त केले. “सध्या निवडणूक आयोगाद्वारे सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने चालू आहे. नावे वगळल्यास किंवा जोडायची असल्यास आपल्याकडे त्यात सुधारणा करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. नागरिक म्हणून आपणही यात सजग असले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. —————- हेही वाचा.. काँग्रेसने बोगस संसद भरवली: आता आम्ही जनतेच्या संसदेत त्यांची पोलखोल करू, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
विरोधी पक्षांनी आणि विशेषतः काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘प्रतिसंसदेवर’ भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली आहे. “काँग्रेसने बोगस संसद भरवली असून, आता आम्ही जनतेच्या संसदेमध्ये जाऊन काँग्रेसची पोलखोल करू,” असा थेट इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच, काँग्रेसला बोगस मतदान करून निवडून येण्याची सवय असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *