![]()
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारवर चौफेर टीका केली आहे. कुंभमेळ्यातील खर्च, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, पतंजलीचे प्रॉडक्ट्स, अजित पवार गटाची अमित शहांशी झालेली भेट अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी सडेतोड भाष्य करत सरकारला धारेवर धरले. “तुम्हाला वाटत असेल मी हिंदू विरोधी किंवा धर्मविरोधी आहे, तर खुशाल म्हणा, पण जो शेतकरी मरतोय तो हिंदू नाही का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. ‘शेतकरी मरतोय, अन् कुंभमेळ्यात १६ कोटींची उधळपट्टी’: शेतकरी आत्महत्या आणि कुंभमेळ्यातील खर्चाच्या तफावतीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “गेल्या आठवडाभरात ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, पण सरकारला त्याचे काही पडलेले नाही. दिवाळीला ५००० रुपये देतो म्हटले, पण तेही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. दुसरीकडे, कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावर १६ कोटी रुपये उधळले. हेच पैसे जर एखाद्या जिल्ह्याला दिले असते, तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करायची पाळी आली नसती. राष्ट्रपतींच्या हेलिपॅडसाठी ३ कोटी रुपये खर्च केले. हा शुद्ध भ्रष्टाचार आहे. धर्माच्या नावाखाली महाराष्ट्र लुटण्याचा गोरखधंदा सुरू आहे.” ‘तो शेतकरी हिंदू नाही का? थोडी तरी लाज ठेवा’: कुंभमेळ्यावर होणाऱ्या टीकेला धर्मविरोधी रंग दिला जात असल्याबाबत ते म्हणाले, “मला म्हणू देत मी कुंभमेळ्याचा विरोधक आहे, धर्मविरोधी आहे, हिंदू विरोधी आहे, पण जे शेतकरी आत्महत्या करतायत ते हिंदू नाहीत का? ते त्या धर्माचे नाहीत? जो मरतोय तो हिंदू नाही का? थोडी तरी लाज आणि शरम ठेवा. हे सगळे ढोंगी नाटक बंद करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.” ‘पतंजलीचे प्रॉडक्ट्स १००% बोगस’: अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) जप्त केलेल्या रामदेव बाबांच्या पतंजली तुपाबाबत विचारले असता, त्यांनी रामदेव बाबांवर जोरदार निशाणा साधला. “रामदेवचे हे सगळे प्रॉडक्ट्स १००% बोगस आहेत. तो स्वतः निर्मिती करत नाही, बाहेर बनवून घेतो आणि आपला ठप्पा मारून विकतो. जेवढ्या मधमाशा नसतील तेवढे मध आणि जेवढ्या म्हशी नसतील तेवढे तो तूप विकतो. लोकांना कळत नाही की रामदेव बाबा डोळा मारून लोकांना सांगतोय की हे बोगस आहे. योगा-योगा म्हणत तो धंदेवाला आणि व्यापारी झाला आहे.” ‘अर्थखात्यासाठी अजित पवार गटाची लाचारी’: अजित पवार गटाच्या नेत्यांनी दिल्लीत अमित शहा यांची घेतलेली भेट आणि अर्थखात्याच्या मागणीवर वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली. “अर्थखातं मिळावं म्हणून ही लाचारी सुरू आहे. उठसूट कुणीतरी उठतो आणि जाऊन भेटतो. एवढी लाचारी मी कधीच पाहिली नाही. हा पक्ष लाचारांचा पक्ष झाला आहे. हातात कटोरा घेऊन भाजपच्या हायकमांडपुढे उभे राहावे लागते, हे या पक्षाचे दुर्दैव आहे.” ————– हेही वाचा.. काँग्रेसला बोगस मतदान करून निवडून येण्याची सवय: त्यांच्या स्वभावाला कीड लागलीय, जनतेच्या संसदेत त्यांची पोलखोल करू – चंद्रशेखर बावनकुळे
विरोधी पक्षांनी आणि विशेषतः काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘प्रतिसंसदेवर’ भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली आहे. “काँग्रेसने बोगस संसद भरवली असून, आता आम्ही जनतेच्या संसदेमध्ये जाऊन काँग्रेसची पोलखोल करू,” असा थेट इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. काँग्रेसला बोगस मतदान करून निवडून येण्याची सवय असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. काँग्रेसने प्रतिसंसद भरवल्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे. त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देण्यात येत आहे. सविस्तर वाचा
Source link
अर्थखात्यासाठी कटोरा घेऊन भाजपच्या दारात, एवढी लाचारी कधी पाहिली नाही:वडेट्टीवारांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल, म्हणाले- शेतकऱ्यांचा आत्महत्येला सरकार जबाबदार