Headlines

हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडून टोरंटला विरोध करा!:खालापूरमधील तटकरेंची दारू फॅक्टरी आधी बंद करा; शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल




रायगड जिल्ह्यामध्ये सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता विकोपाला पोहोचला आहे. कर्जत परिसरातील महत्त्वाकांक्षी टोरंट वीज प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी स्थानिक ग्रामस्थांसह विरोध दर्शवत आंदोलन उभारल्यानंतर, शिंदेसेनेचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना जाहीर आव्हान दिले आहे. “टोरंट प्रकल्पाला केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रीतसर मंजुरी दिली आहे. जर सुनील तटकरेंना आणि त्यांच्या पक्षाला सरकारच्याच विकासकामांना विरोध करायचा असेल, तर त्यांनी आधी मंत्रिमंडळातून आणि सत्तेतून बाहेर पडावे; मग विरोध करायला समोर यावे,” असा संतप्त इशारा आमदार थोरवे यांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर, खालापूर तालुक्यात सुनील तटकरे यांचे चिरंजीव आमदार अनिकेत तटकरे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भागीदारीत उभारल्या जाणाऱ्या कथित बेकायदेशीर दारू कारखान्यावर टीका करत थोरवे यांनी तटकरे कुटुंबावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुलगा आणि साडूच्या पार्टनरशिपमध्ये दारूची फॅक्टरी सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर तोफ डागताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, “खालापूर तालुक्यातील चिलठण ग्रामपंचायतीचा तीव्र विरोध असतानाही, उजळोली येथे सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे आणि तटकरेंचे साडू यांच्या भागीदारीतून दारूची महाकाय फॅक्टरी उभारली जात आहे. सर्व बोगस एनओसी (NOC) मिळवून प्रशासकीय दादागिरीच्या बळावर हे काम सुरू आहे.” जनतेची काळजी असेल तर फॅक्टरी बंद करा “मी या ठिकाणी सुनील तटकरेंना जाहीरपणे सांगतो—आपण खालापूर तालुक्यात आणलेली ही दारूची फॅक्टरी आधी बंद करा! जर तुम्हाला खरोखर जनतेची आणि पर्यावरणाची काळजी असेल, तर स्वतःच्या नेत्याच्या या कारखान्याविरोधात सुधाकर घारे यांनी जाऊन आधी आंदोलन करावे. घारेंनी ती फॅक्टरी बंद पाडली, तर आम्ही स्वतः त्यांच्या खांद्याला खांदा लावून कर्जतमध्ये उभे राहू.” टोरंटला केंद्र अन् फडणवीसांची मंजुरी; मग विरोध करायला सत्ता कशाला हवी? टोरंट पॉवर प्रकल्पावरून राष्ट्रवादीच्या दुटप्पी भूमिकेचा पंचनामा करताना ते म्हणाले, “टोरंट प्रकल्प हा पूर्णपणे पर्यावरणपूरक असा ऊर्जा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाने आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिलेली आहे. सुनील तटकरे हे स्वतः केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची कन्या आदिती तटकरे या राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. एका बाजूला सत्तेत राहायचे आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाध्यक्षांमार्फत शासकीय प्रकल्पांवर आंदोलने करून आडकाठी आणायची, हा दुटप्पी कारभार आता चालणार नाही.” सत्तेतून बाहेर पडण्याचे थेट आव्हान “जर राज्य सरकारच्याच अधिकृत विकास प्रकल्पाला विरोध करायचा असेल, तर आधी सत्तेतून बाहेर पडा, मंत्रिपदाचे राजीनामे फेका आणि मग रस्त्यावर उतरा; आम्हीही यावर दोन हात करायला आणि सडेतोड उत्तर द्यायला पूर्णपणे तयार आहोत.” कर्जतच्या जनतेने तुम्हाला नाकारले विधानसभा निवडणुकीतील पराभवाची आठवण करून देत थोरवे यांनी विरोधकांना सुनावले. “कर्जत मतदारसंघातील जनतेने तुम्हाला पूर्णपणे नाकारले आहे, तुमचा दारुण पराजय केला आहे. हा पराभव पचवता न आल्याने मतदारसंघातील प्रत्येक चांगल्या प्रकल्पाला केवळ विरोधासाठी विरोध करण्याचे गलिच्छ काम सुरू आहे आणि खासदार सुनील तटकरे अशा बेजबाबदार नेत्यांना पाठीशी घालत आहेत.” शांत आहोत म्हणजे दुर्बल नाही “आम्हाला बोलता येत नाही असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. आम्ही युतीधर्म पाळण्यासाठी डोक्यावर बर्फ ठेवून शांतपणे संयमाने काम करत आहोत. मात्र जर कोणी आमच्या संयमाचा अंत पाहत असेल, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ,” असा थेट इशारा त्यांनी शेवटी दिला. रायगड जिल्ह्यातील टोरंट प्रकल्प आणि दारू कारखान्यावरून दोन प्रमुख सत्ताधारी आमदारांमध्ये सुरू झालेल्या या जुंपीमुळे महायुतीमधील अंतर्गत दरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, यावर आता सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. —————————————————————- हेही वाचा… भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये: मोदींना पळून जाऊ देणार नाही, त्यांच्यावर खटले चालणार, त्यांच्यासह सर्व जेलमध्ये जाणार- संजय राऊत भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये. त्यांनी जर खरोखरच महाराष्ट्राची चिंता केली असती, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडली नसती, असा जोरदार घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. चलो दिल्ली रॅलीच्या यशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *