![]()
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी 1 नोव्हेंबर रोजी रात्री 8.20 वाजता नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. रात्रीच्या वेळी स्वतः आरोग्यमंत्री केंद्रात दाखल झाल्याचे पाहून स्थानिक आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या अचानक भेटीदरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि रुग्णांना मिळणाऱ्या असमाधानकारक उपचारांबाबत मंत्र्यांकडे थेट तक्रारी केल्या. मंत्री आबिटकर यांनी ग्रामस्थांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत आरोग्य केंद्रातील उपलब्ध सुविधा, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवेचा सविस्तर आढावा घेतला. तातडीने कारवाई व बदल्या आरोग्य सेवेत हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर होत असल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास आल्यावर मंत्री आबिटकर यांनी तातडीने कठोर पावले उचलली. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची गंभीर दखल घेत त्यांनी प्रशासकीय कारवाईचे निर्देश दिले आणि जागेवरच त्यांच्या बदलीचे आदेशही काढले. रुग्णसेवेबाबत स्पष्ट संदेश ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश आरोग्यमंत्र्यांनी प्रकाश आबिटकर यांनी या कारवाईतून दिला. केवळ आढावा बैठका न घेता थेट जमिनीवर उतरून कारवाई करण्याच्या त्यांच्या या तत्पर कार्यपद्धतीचे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत स्वागत केले. हे ही वृत्त वाचा.. मुंढेंचा धडाका अन् थेट मंत्र्यांचाच ब्रेक:रांजणगावच्या मिथेनॉल कंपनीवरील कारवाई झिरवाळांकडून स्थगित, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दबाव असल्याचा आरोप अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाची धुरा हाती घेतल्यापासून भेसळखोर, बेकायदेशीर रासायनिक कारखाने आणि औषध माफियांविरुद्ध धडक कारवाईची मोहीम उघडणारे कर्तव्यकठोर आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांना थेट त्यांच्याच खात्याच्या मंत्र्यांकडून मोठा दणका बसला आहे. पुण्यातील विषारी दारू कांडाच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित मिथेनॉल रासायनिक कंपनीवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परवाना रद्द करण्याची कठोर कारवाई केली होती. मात्र, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या कारवाईला अचानक स्थगिती (Stay) देत कंपनीचा रद्द केलेला परवाना पूर्ववत केल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
Source link
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची अचानक आरोग्य केंद्राला भेट:आरोग्य यंत्रणेची एकच धावपळ; हलगर्जीपणा करणाऱ्यांवर थेट कारवाई