अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या उर्वरित 10 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत पहिला मोठा निकाल समोर आला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पारनेर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून खासदार नीलेश लंके यांनी विजय मिळवला आहे. त्
.
पारनेर मतदारसंघात खासदार नीलेश लंके (लंके-लोखंडे गट) आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचे निकटवर्तीय राहुल शिंदे (सहकार पॅनल) यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत एकूण 104 मतदारांपैकी नीलेश लंके यांना 63 मते मिळाली, तर राहुल शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. जिल्हा बँकेच्या सत्तेसोबतच ही राजकीय प्रतिष्ठेची लढाई मानली जात होती, ज्यामध्ये अखेर नीलेश लंके यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
11 जागा आधीच बिनविरोध
जिल्हा बँकेच्या एकूण 21 संचालक पदांपैकी 11 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये विखे-थोरात यांच्या सहकार पॅनलला यश मिळाले होते. (दरम्यान, 2021 च्या निवडणुकीत 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या होत्या). उर्वरित 10 जागांसाठी उर्वरित उमेदवारांमध्ये लढत होत असून, या निवडणुकीत एकूण 3,837 मतदारांनी हक्क बजावला होता. बँकेसाठी एकूण 99.27 टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते.
या लढतीकडे होते सर्वांचे लक्ष
पारनेर : खा. नीलेशलंके (लंके-लोखंडे गट) यांच्या विरोधात राहुल शिंदे (विखे-थोरात-गडाख आघाडी)यांच्यातील लढत.
राहुरी : आ.प्राजक्त तनपुरे (आघाडी) VS सत्यजित कदम (अपक्ष).
अकोले : आ. किरण लहामटे आणि संजीवनी शिंदे हे दोघेही रिंगणात.
कर्जत : तुषार पिसाळ यांच्या विरोधात ज्योती शिंदे (राम शिंदे गट).
हे ही वृत्त वाचा
सातारा जिल्हा बँक निवडणूक निकाल:शंभूराज देसाईंचा पाटणमध्ये विजय, भाजपला धक्का; जावळीत शिवेंद्रराजेंच्या समर्थकाची बाजी

राज्यातील सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर, पहिल्याच तासात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी दणदणीत विजय मिळवला आहे, तर दुसरीकडे जावळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. वाचा सविस्तर