Headlines

मला रॅम्प वॉकची हौस नाही:पण ग्रामीण महिलांच्या खिशात 4 पैसे जात असतील तर पुन्हा रॅम्पवर जाईन- पंकजा मुंडे




‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’मध्ये जालना जिल्ह्यातील शेतकरी महिलांनी तयार केलेल्या ‘जालनाई’ साडीचे प्रमोशन करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या रॅम्प वॉकवरून सध्या मोठे राजकारण तापले आहे. विरोधकांनी दुष्काळाचे कारण देत त्यांच्यावर जोरदार टीका केली. या सर्व टीकेला आज स्वतः पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. “मला रॅम्प वॉक करण्याची कोणतीही हौस नाही, पण ग्रामीण महिलांच्या खिशात चार पैसे जात असतील, तर त्यांच्यासाठी मी पुन्हा रॅम्पवर जाईन,” असा पलटवार त्यांनी केला आहे. ‘महिलांच्या हक्कासाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन’ रॅम्प वॉकवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी गेल्या २२ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे आणि ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करते. ग्रामीण महिलांना न्याय मिळावा, त्यांच्या कामाला ओळख मिळावी यासाठीच मी तो रॅम्प वॉक केला. ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’मध्ये जालन्यातल्या महिलांचा स्टॉल लागणे आणि सेलिब्रिटी, मॉडेल्सनी त्या साड्या पाहून ऑर्डर्स देणे, ही फार मोठी गोष्ट आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “मला रॅम्प वॉक करण्याची काहीही हौस नाही. विरोधकांच्या या टीकेला उत्तर देण्याचीही मला आवश्यकता वाटत नाही. पण जर माझी जालन्यातली साडी मुंबईतली एखादी महिला विकत घेत असेल आणि तो पैसा माझ्या जालन्याच्या महिलेच्या खिशात जाणार असेल, तर त्या महिलांसाठी मी परत जाऊन रॅम्प वॉक करेन.” अजित पवार गट आणि अमित शहा भेटीवर बोलणे टाळले राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट आणि सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. “मी यावर काय टिप्पणी करणार? ज्या दोन जणांची भेट झाली, तेच यावर बोलू शकतील. मी यावर भाष्य करणे उचित नाही,” असे त्या म्हणाल्या. जालना आणि बीडच्या बैठकींबाबत काय म्हणाल्या? जालना जिल्ह्याच्या संदर्भात बैठक होणार असल्याबाबत विचारले असता, मुंडे यांनी मंत्रिमंडळात या विषयांवर चर्चा होत असल्याचे सांगितले. दौऱ्याचे नियोजन करताना मंगळवार असल्याचे लक्षात न राहिल्याने काही गोंधळ झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपण दिल्लीहून छत्रपती संभाजीनगरला आल्यामुळे दौऱ्याच्या नियोजनात ही चूक झाल्याचे त्या म्हणाल्या. बीड जिल्ह्याची बैठक दोन दिवसांनी लावल्याचेही त्यांनी सांगितले. ——————- हेही वाचा.. पंकजा मुंडेंच्या रॅम्प वॉकवरून विरोधक आक्रमक: संजय राऊत म्हणाले- मुंडेंना रॅम्प हेच पर्यावरण वाटते; इम्तियाज जलील अन् पटोलेंचाही सरकारवर घणाघात
भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा मुंबईतील एका फॅशन शोमधील रॅम्प वॉकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मुंडे यांनी या बॉम्बे फॅशन्सच्या कार्यक्रमात रॅम्प वॉक केला. मात्र, राज्याच्या अनेक भागांत, विशेषतः मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना मंत्र्यांनी अशा फॅशन शोमध्ये सहभागी होण्यावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, काँग्रेस नेते नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांनी यावरून राज्य सरकार आणि पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *