Headlines

Navnath Ban Slams Uddhav Thackeray Over Rahul Gandhi Slavery Statement


सत्तेसाठी हिंदुत्व सोडून काँग्रेससोबत जाणे, बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडणे आणि राहुल गांधींची गुलामी करणे, यालाच लाचारी असे म्हणतात, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आहे.

.

नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता उरलेला नाही, त्यांचा केवळ एक बचत गट झाला आहे. हा बचत गटाचा अध्यक्ष तुम्ही राहुल गांधींकडे नेऊन सोपवला आहे. उबाठा गटाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असून, त्यासाठीच राऊतांनी सुपारी घेतली आहे, त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका करू नये. ना राष्ट्रवादी अनाथ आहे, ना शिवसेना. प्रत्यक्षात उबाठा गटच अनाथ झाला आहे, कारण त्यांच्यावरील हिंदुत्ववादी छत्र हरवले आहे. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना निवडणुकीत जागा दाखवून अनाथ करण्याचे काम केले आहे, ज्याचे आत्मपरीक्षण राऊतांनी केले पाहिजे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे ते अनाथ नाहीत; मात्र उबाठा गट आणि राऊत खऱ्या अर्थाने अनाथ झाले आहेत.

राहुल गांधी चीनच्या मार्फत लोकशाहीची हत्या करताय

नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी चीनच्या मार्फत लोकशाहीची हत्या करण्याचे काम करत आहेत आणि संजय राऊतांकडून त्यांना सहकार्य केले जात आहे. या मंडळींचा देशाच्या संविधानावर विश्वास नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे की, एसआयआर बाबत काही शंका असतील, तर संसदेत या; प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल. परंतु राहुल गांधी, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे चर्चा करायला तयार नाहीत. कारण त्यांना चर्चेत रस नसून, केवळ घुसखोरांच्या मतांवर स्वतःचा राजकीय फायदा करून घ्यायचा आहे.

उद्धव ठाकरेंचे नाव घेण्याचे सौजन्यही दाखवले जात नाही

नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत मोठ्या स्वाभिमानाने राहुल गांधींच्या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी गेले होते, मात्र राहुल गांधींनी त्यांना साधे स्टेजवर बोलूसुद्धा दिले नाही. उद्धव ठाकरे सातत्याने राहुल गांधींचे कौतुक करत असतात, पण राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेशी संवाद साधणे सोडा, त्यांचे नावसुद्धा घेतले जात नाही; हाच का तुमचा स्वाभिमान? असा सवाल त्यांनी केला.

स्वाभिमानाच्या गप्पा मारूच नयेत

नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व सोडत काँग्रेसचे विचार आत्मसात केले, हा तुमचा स्वाभिमान आहे का? अडीच वर्षे सत्तेत असताना महाराष्ट्रातील मराठी माणसांना देशोधडीला लावण्याचे काम केले, पत्रा चाळीतील लोकांना बेघर केले, पत्रकारांना अटक केली आणि विरोधकांची घरे तोडली, हा तुमचा स्वाभिमान आहे का? त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारूच नयेत.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे तेव्हाच गाडलं गेले

नवनाथ बन म्हणाले की, जनाब संजय राऊतांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे दिल्लीत बांधण्यात आले आहे. परंतु, 2019 मध्ये जेव्हा तुम्ही काँग्रेससोबत गेलात, त्याचवेळी तुम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान काँग्रेसच्या चरणावर अर्पण केला होता. ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडली, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मते मागितली आणि मुख्यमंत्री होण्याची वेळ आली, त्यावेळी काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष बांधून तुम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान राहुल गांधींच्या चरणाखाली गाडला. त्यामुळे तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी अजिबात करू नये, असे प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिले.

हे ही वृत्त वाचा शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये भाजप कोंबड्यांची झुंज लावत आहे:लवकरच हे दोन्ही पक्ष संपणार; संजय राऊतांचा महायुतीतील मित्रपक्षांवर हल्लाबोल

राज्यातील राजकीय घडामोडींवर आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेनेतील (शिंदे गट) अंतर्गत राजकारणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सडकून टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी नुकत्याच झालेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांच्या भेटीचा संदर्भ देत राऊत यांनी, “हे मूळ पक्ष नसून महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी अमित शहांनी निर्माण केलेले गट आहेत, आणि भविष्यात हे दोन्ही पक्ष अमित शहा पूर्णपणे नष्ट करणार आहेत,” असा मोठा दावा केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.