![]()
राज्यात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा राजकीय कलगीतुरा रंगला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या मदतीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेले असतानाच, आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार आणि कर्नाटकातील काँग्रेस सरकार यांच्यातील शेतकरी मदतीच्या धोरणांची तुलना करत, वाघ यांनी काँग्रेसवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा गंभीर आरोप केला आहे. ‘महाराष्ट्रात विनाअट मदत, कर्नाटकात जाचक अटी’ चित्रा वाघ म्हणाल्या, आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे की, एकीकडे शब्दाला जागून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपले महायुतीचे सरकार आहे, तर दुसरीकडे केवळ आश्वासनांची धूळफेक करणारे काँग्रेसचे सरकार आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दीड कोटी बळीराजाच्या खात्यात कोणतीही अट न ठेवता थेट ५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. इथे कसलीही कागदपत्रांची जत्रा नाही, थेट बँक खात्यात पैसे दिले जात आहेत. हीच देवाभाऊंची नियत आहे.” काँग्रेसवर निशाणा कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मदतीचे उदाहरण देत चित्रा वाघ म्हणाल्या, “कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना अवघ्या अडीच हजार रुपयांची मदत देण्यासाठी १७ जाचक अटींचा डोंगर उभा केला आहे. या अटींच्या जाळ्यात अडकवून तिथल्या शेतकऱ्यांना मदतीपासून पूर्णपणे वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे. काँग्रेसच्या या दुटप्पी धोरणाचा आज पर्दाफाश झाला आहे.” ‘काँग्रेसने बळीराजाच्या पाठीत खंजीर खुपसला’ काँग्रेसवर अधिक आक्रमक होत वाघ यांनी विचारले की, “महाराष्ट्रात दीड कोटी शेतकऱ्यांना विनाअट मदत दिली जात असताना, मग काँग्रेसने कर्नाटकातल्या बळीराजाच्या पाठीत १७ जाचक अटींचा खंजीर का खुपसला? काँग्रेससाठी शेतकरी ही फक्त त्यांची वोट बँक आहे, तर देवाभाऊंसाठी बळीराजा हाच या राज्याचा खरा मालक आहे.”
—————– हेही वाचा.. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!:5 हजारांची अग्रीम मदत खात्यात जमा व्हायला सुरुवात; 31 हजार कोटींच्या प्रस्तावावर प्रताप सरनाईकांची मोठी माहिती
राज्यात दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी पीक विम्याची आणि सरकारी मदतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रीम मदत सोमवारपासून देण्यास सुरुवात झाली असून, दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी मोठ्या आणि भरीव मदतीची घोषणा केली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा
Source link
महाराष्ट्रात विनाअट 5 हजार, तर कर्नाटकात 17 अटींचा जाच:चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाल्या- काँग्रेससाठी शेतकरी केवळ व्होटबँक